नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाच वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी फाटा परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विल्होळी नाका येथे १३५ दशलक्ष लिटर क्षमेतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून केंद्राचा प्रस्ताव साकारला जाईल किंवा सिंहस्थ निधीतून केंद्र उभारले जाणार आहे. (Expansion of Vilholi Water Treatment Plant Preparations for Simhastha Kumbh Mela Nashik News)
जवळपास २० लाख लोकसंख्येच्या नाशिक शहराला गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. वाडीवऱ्हेजवळ असलेल्या मुकणे धरणातून १८ किलो मीटर लांबीची व जवळपास १८०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली आहे.
विल्होळी येथे महापालिकेच्या जागेत १३७ दशलक्ष लिटर क्षमेतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून पूर्व विभागात पुरवठा केला जातो. विशेष करून पाथर्डी फाटा परिसर, इंदिरानगर तसेच, वडाळा गावापर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे.
परंतु या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. मुंबईला ये- जा करणे सहज सोपे असल्याने अनेकांचा या भागात वास्तव्याकडे कल आहे. त्यामुळे नवीन गृहप्रकल्प या भागात उभारले जात आहे. येत्या काळात तीस मजल्याचे टॉवर या भागात प्रस्तावित आहे.
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
त्यामुळे या भागात पाणीपुरवठा अधिक करावा लागेल. वर्षागणिक मुकणे धरणात नाशिकसाठी पाणी आरक्षणात वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेऊन विल्होळी नाका येथे १३५ दशलक्ष लिटर क्षमेतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आवश्यक राहणार आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने पाणीपुरवठा विभागाकडून हा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित केला जाणार आहे.
अमृत दोन योजनेतून प्रकल्प
केंद्र सरकारकडे अमृत दोन योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावातून जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाईल. किंवा सिंहस्थासाठी प्राप्त होणाऱ्या निधीतून प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.
विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राबरोबर जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलणे, तसेच गंगापूर धरणापासून शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२ किलोमीटर लांबीची सिमेंट पाइपलाइन बदलून त्याच्याऐवजी लोखंडी पाइपलाइन टाकली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.