CCTV cameras installed under Smart City Department at Sunday Karanja. esakal
नाशिक

Nashik : शहरभर CCTV बसविण्याच्या कामास वेग; संपूर्ण शहर तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : खासगी मनोरंजन वाहिनीवर एका कार्यक्रमातील स्पर्धकांवर ज्या पद्धतीने चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवत त्यांच्या कार्याचे मूल्यांकन केले जात आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण शहरदेखील सीसीटीव्ही माध्यमातून महापालिका आणि पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येण्यासाठी स्मार्टसिटीअंतर्गत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहे. मुख्य चौकांमध्ये कॅमेरे लावलेदेखील आहे. (Expediting installation of CCTV across city to prevent crime Nashik Crime Latest Marathi News)

स्मार्टसिटीअंतर्गत शहर स्मार्ट केले जात आहे. त्यासाठी विविध प्रकारचे कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचे काम अर्थातच शहरभरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण शहर तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत येणार आहे. छोट्या- मोठ्या प्रत्येक घटना घडामोडी कॅमेऱ्यात कैद होणार आहे. इतकेच नाही तर गुन्हेगारीसदेखील आळा बसण्यास मदत होणार आहे.

त्यानिमित्ताने कॅमेरे बसविण्याच्या कामांना वेग आला आहे. बहुतांशी मुख्य चौक, भागात कॅमेरे बसविण्यात आले आहे. या सर्व कॅमेऱ्याचे कंट्रोल पंचवटी येथील स्मार्टसिटी विभागाच्या कार्यालयात असणार आहे. त्या माध्यमातून महापालिका आणि पोलिस विभागास विविध घटना घडामोडी, महापालिकाअंतर्गत सुरू असलेले कामे यावर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. याशिवाय रस्त्यावर महिलांची छेडखानी, गर्दीची संधी साधत होणारी लूटपाट अशा विविध घटनांना पायबंद घालण्यास मदत होणार आहे.

सध्या सीबीएस, मेहेर सिग्नल, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल अशा विविध भागात कॅमेरे बसविण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण शहरभर विविध ठिकाणी मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेची नजर असल्याचे बघावयास मिळणार आहे. या माध्यमातून दुचाकींसह विविध प्रकारच्या वाहनांची तसेच इतर अनेक प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या तिसऱ्या डोळ्यामुळे नागरिकांना शहरात बिनधास्त वावरता येणार आहे. यामुळे नागरिकांकडून या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT