NMC News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. अवघ्या चार ते पाच दिवसांत करोडो रुपये खर्च झाल्यानंतर त्या खर्चाचा हिशोब शासनाकडून मागविला जाणार असून, तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येक खर्चाचा हिशोब जुळविण्याची कसरत महापालिकेकडून सुरू आहे. (expenses of Prime Minister visit will be sought by government nashik nmc news)
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा झाला. प्रारंभी नेहरू युवा केंद्राच्या युवा महोत्सवाचे उद्घाटन व जाहीर सभा एवढ्यापुरता दौरा निश्चित होता. परंतु त्यानंतर रोड-शो, श्री काळाराम मंदिर दर्शन, गोदापूजन हे तीन नवीन कार्यक्रम जोडले गेले. सुरवातीला तपोवनातील मोदी मैदानावर सर्व कार्यक्रम होते. त्यामुळे हेलिपॅडपासून ते मोदी मैदानापर्यंत जाणारे रस्ते चकचकीत करण्यात आले.
परंतु कार्यक्रमांची व्याप्ती वाढल्यानंतर कामेही वाढली. दौऱ्यानिमित्त क्रीडा विभागाला सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून शहरात विविध प्रकारची कामे करण्यात आली. रोड शो दरम्यान झाडांवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावणे, रस्ते दुरुस्ती, नवीन रस्ते तयार करणे, गोदाघाट परिसरात रामायण प्रसंगातील चित्र रेखाटने, नदी घाट स्वच्छता, दुभाजकांची रंगरंगोटी, पथदीपांवर तिरंगी एलईडी लाइट लावणे, रामकुंडावर कृत्रिम लॉन्स टाकणे, सजावट, रस्ते धुणे, वाहतूक बेटाची साफसफाई, बोर्ड रंगविणे, होर्डिंग्ज लावणे आदी प्रकारची कामे झाली.
क्रीडा मंत्रालयाकडून विशेष निधी
दौऱ्याच्या तीन ते चार दिवस अगोदर अशा प्रकारची कामे केल्याने घाईघाईत कामे झाली. शिवाय खर्चाला मंजुरी नंतर घेतली जाणार असल्याने शासनाकडून खर्चाची यादी मागविली जाणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. खर्चासाठी क्रीडा मंत्रालयाकडून विशेष निधी मंजूर झाला. महापालिकेला या खर्चातून निधी वर्ग केला जाणार आहे.
सढळ हाताने खर्च झाला असला तरी खर्चातून हात धुवून घेण्याचा प्रकार होऊ नये व अशा कामांमुळे केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाऊ नये, यासाठी खर्चाचा काटेकोर हिशोब ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने आता राज्य शासनाकडे खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. राज्य शासनाकडून क्रिडा व युवा मंत्रालयाला हिशोब सादर केला जाणार असल्याचे समजते.
प्रत्येक वस्तूचा लागणार हिशोब
दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या. वस्तुंची लावलेली किंमत तसेच काही वस्तू भाडे तत्त्वावरही घेण्यात आल्या होत्या. वस्तुंचे लावलेले भाडे दर याचाही हिशोब मागितला जाणार असल्याने हिशोब तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरु आहे. दरांमध्ये तफावत आढळू नये, याची काळजी घेतली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.