car  esakal
नाशिक

Nashik Crime News : महागडी क्रेटा कार चोरीला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील यशवंत महाले यांची १८ लाखांची क्रेटा कार (एमएच १५ जेएम १३३६) जव्हार फाटा परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. (Expensive Creta car stolen outside hotel nashik crime news)

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील हे नाशिक दौर्यावर असताना गेल्या मंगळवारी (ता.२१) रात्री सदरची कार चोरीला गेली आहे. दिवाळी पाडव्याच महाले यांनी सदरची कार खरेदी केली होती.

यशवंत भीका महाले (रा. वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता.२१) रात्री मनोज जरांगे-पाटील हे त्र्यंबकेश्वरमध्ये आलेले होते.

त्यावेळी महाले हेही त्यांच्या समर्थनार्थ सहभागी झाले होते. जव्हार फाया परिसरातील अन्नपूर्णा हॉटेलच्या बाजुला त्यांची १८ लाखांची क्रेटा कार (एमएच १५ जेएन १३३६) पार्क केली होती. रात्री पावणे नऊ ते सव्वा दहा या दरम्यान त्यांची कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाले यांनी सदरची कार दिवाळी पाडव्याच्या दिवशीच खरेदी केली होती. अवघ्या आठवडाभरात त्यांची कार चोरीला गेली. सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT