Outdated Fire Extinguisher in Divisional Office. esakal
नाशिक

Nashik News : दुसऱ्यास ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; सिडको कार्यालयात मुदतबाह्य अग्निशमन सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा

विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात एकीकडे १४ ते २० एप्रिलपर्यंत अग्निशमन सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. प्रात्यक्षिकाद्वारे कशा उपाययोजना कराव्यात हे अग्निशमन विभागाकडून दाखवून देण्यात येत आहे. याबाबत महापालिका प्रशासन सर्व विभागीय कार्यालयात बॅनरबाजी करत आहे.

ही बॅनरबाजी सुरू असताना मात्र सिडको विभागीय कार्यालयात १४ एप्रिलपर्यंत मुदत असलेले अग्निशमन सिलिंडर कालबाह्य झालेले असतानाही यावर विभागीय कार्यालयाने काहीही उपाययोजना केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. (Expired fire cylinders at CIDCO office Nashik News)

शहरातील विविध इस्पितळे, क्लासेस, इमारतींना अग्निशमन यंत्र बसवणे बंधनकारक असताना मात्र ‘दुसऱ्यास शिकावे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण’ अशी स्थिती सिडको विभागीय कार्यालयाची झाली आहे.

एखादा भीषण प्रसंग घडल्यानंतर मनपा प्रशासनास जाग येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्याकडे दोन विभागीय कार्यालयांचा पदभार असताना पाहिजे तितके लक्ष सिडको विभागीय कार्यालयात देणे खरंच त्यांना शक्य होत नसावे, असा सवालही उपस्थित केला आहे.

याबाबत सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. हे अग्निशमन यंत्र १५ एप्रिल २०२२ ते १४ एप्रिल २०२३ पर्यंतचं वैध असल्याचे यावर स्पष्ट नमूद केले आहे.

असे असताना हे यंत्र अपात्र होऊन ५ दिवस उलटून गेलेले असतानाही मात्र या गंभीर बाबीकडे सिडको विभागीय कार्यालयातील कोणाचेही लक्ष नसणे ही आश्चर्याची बाब म्हणावी की निष्काळजीपणा.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

कारवाईकडे लक्ष

सिडको विभागीय कार्यालयात दैनंदिन कामकाज पाहता मोठ्या लोकसंख्या असलेल्या लोकवस्तीतील अनेकांच्या समस्या सोडवाव्यात लागतात. मात्र आपलं ठेवावं झाकून अशी गत विभागीय कार्यालयाची झालेली असून जे स्वतःच्याच इमारतीतील कामाबाबत निष्काळजीपणा करत असतील ते इतरांच्या समस्या सोडवताना काय होतं असेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अग्निशमन यंत्रांच्या कामकाज एक खासगी कंपनीस काम देण्यात आलेले असून, या कंपनी व्यवस्थापनाने ही गंभीर बाब सांभाळणे गरजेचे असताना मात्र त्यांचाही निष्काळजीपणा येथे स्पष्ट दिसून येत आहे. यानंतर काय कार्यवाही होणार, या बाबीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

"सदर अग्निशमन सिलिंडरमधील केमिकल पूर्णतः निरुपयोगीच झालेले असून एखादा भीषण प्रकार घडल्यास या यंत्राचा काहीही उपयोग होणार नाही."

- मिलिंद नवले, शर्मिला फायर सेफ्टी व्यवस्थापक

"मनपा प्रशासनाने याबाबत जागृत राहणे गरजेचे असून याबाबत दोषींवर योग्य कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे. तर ठेका दिलेल्या कंपनीचा ठेका देखिल रद्द व्हायला हवा."

- किरण राजवाडे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT