नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ११ मार्च २०२० ला कोरोना (Corona) ही महामारी जाहीर केली. तेव्हापासून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत या महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अथवा हयात, कायदेशीर, दत्तक, एकल दत्तक पालक गमावलेल्या बालकांसाठी पीएम केअर्स योजना राबविण्यात येते. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ ला संपली होती. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व पात्र बालकांची नोंद करता येईल.
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने (Ministry of Women & Child Development) योजनेला मुदतवाढ दिली आहे. योजनेचा लाभ पालकाच्या मृत्यूदिनी ज्या बालकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते, अशा सर्व बालकांना घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी महामारीमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी २९ मे २०२१ ला सर्वसमावेशक मदत जाहीर केली होती. महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांना समावेशक सुविधा आणि संरक्षण मिळेल याची सुनिश्चिती करणे, तसेच शाश्वत पद्धतीने आरोग्य विम्याच्या(Health Insurance) माध्यमातून या बालकांना स्वास्थ्य मिळवून देणे, शिक्षणाची सोय करून त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षापासून ही मुले स्वावलंबीपणे स्वतःच्या पायावर उभी राहावीत यासाठी आर्थिक मदत पुरविणे, हा या योजनेचा उद्देश आहे. पीएम केअर्स योजना (PM Cares Scheme) इतर सुविधांसोबत एकीकृत दृष्टिकोन राबविणे, शिक्षण आणि आरोग्य यांची सुनिश्चिती करण्यासाठी निधीची व्यवस्था करणे, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक विद्यावेतन मिळण्याची सोय करून देणे आणि लाभार्थी २३ वर्षांचा झाल्यावर दहा लाख रुपयांची रक्कम त्याला देणे अशा सर्व उपक्रमांसाठी मदत पुरविते.
ऑनलाइन पोर्टलद्वारे सहभाग
https://pmcaresforchildren.in या ऑनलाइन पोर्टलचा वापर करून योजनेत सहभागी होता येते. पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व पात्र बालकांची पडताळणी, तसेच नोंदणी करण्याच्या सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. कोणताही नागरिक पोर्टलच्या माध्यमातून या योजनेसाठी पात्र असलेल्या मुलाची माहिती प्रशासनाला कळवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.