सटाणा : चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सटाणा शहर वळण रस्त्याची शहरवासीयांची जुनी मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपली प्रतिष्ठा पणास लावून केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपयांची मंजुरी आणली.
परंतु हा बाह्यवळण (बायपास) रस्त्याचे काम तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या लालफितीत अडकल्याने सटाणा बायपासचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजुरी नंतरही रस्त्याचे काम बंद का ? हा प्रश्न तालुक्यातील नागरिकांसमोर उभा आहे. जर बायपास ती काम मार्गी लागणार नसेल तर किमान उड्डाणपूल करण्यात यावा. या अंतिम पर्यायाच्या चर्चेने शहर व तालुक्यात जोर धरला आहे. (External bypass road stuck in red tape 100 crore sanctioned work stalled due to technical difficulties Nashik News)
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी गेल्या दहा वर्षात दिलेल्या वचननाम्याप्रमाणे तालुक्यातील जलसंधारणाची कामे युद्ध पातळीवर करून सिंचनाच्या बाबतीत तालुक्याचा गेल्या कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढला.
तालुका सुजलाम् सुफलाम् करण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मात्र केंद्र शासनाच्या अखत्यारीतील व सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याचे काम रखडले असल्याने आता हे काम कळीचा मुद्दा ठरू लागले आहे.
बाह्यवळण रस्ता होणार की नाही
शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे याठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
अवजड वाहतुकीमुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीला देखील दररोज सामोरे जावे लागते. त्यामुळे साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता होणे गरजेचे आहे. यातही राजकारण आडवे आले.
पूर्वेकडून व्हावा की पश्चिमेकडून असा वाद उकरून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पूर्वीप्रमाणेच हा मार्ग पूर्वेकडून काढण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली.
यासाठी केंद्र शासनाने निधीही मंजूर केला तरीही या मार्गावरील भूसंपादन गेल्या पाच वर्षात होऊ शकले नाही. त्यामुळे हा वळण रस्ता होणार की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
उड्डाणपुलाचा व्हावा विचार
बाह्यवळण रस्ता होईल तेव्हा होईल, मात्र शहरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बायपासवर आडून न राहता शहरातून उड्डाणपूल बांधल्यास अवजड वाहनांची वाहतूक त्यावरून होऊ शकते.
यासाठी जिजामाता उद्यानापासून तर ताहराबाद रस्त्यावरील ईदगाह मैदानापर्यंत उड्डाणपूल बांधल्यास नेल्यास शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचा मार्ग मोकळा होईल. बांधकामातील नव्या तंत्रज्ञानानुसार सदर उड्डाणपुलाचे बांधकाम फक्त बारा कॉलमवर होईल.
त्यासाठी अंदाजे १५० ते १७५ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उड्डाणपूल झाल्यास त्यावरून दुहेरी तर त्याखालील रस्त्यांवरूनही दुहेरी वाहतूक होऊ शकते.
सद्यपरिस्थितीत सटाणा ते मंगरूळ फाट्यापर्यंतच्या चारपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून यात सटाणा वळण रस्त्याच्या कामाचा समावेश नाही.
खासदार डॉ. भामरे यांनी प्रयत्न केल्यास सदरच्या उड्डाणपुलाचे काम हे शंभर टक्के होऊ शकते, असा दावाही करण्यात येत आहे.
असा असेल बाह्यवळण रस्ता
बाह्यवळण रस्त्यासाठी सात वर्षापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात औंदाणे शिवारातून नामपुर, चौगाव व मालेगाव रस्ता ओलांडून आराई शिवारातून सावकी फाट्याजवळून राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाईल.
या बाह्यवळण रस्त्याची एकूण लांबी १२.४० किलोमीटर असून भूसंपादन करावयाचे एकूण क्षेत्र ५२.९७ हेक्टर आहे. भूसंपादन किंमत दोन कोटी तीस लाख रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.