Money Scam esakal
नाशिक

Nashik Crime: निवाणे ग्रामपंचायतीत 30 लाखाचा अपहार; पेसा निधी हडप केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : तालुक्यातील निवाणे - दह्याने ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पेसा अंतर्गत शासकीय योजनेत ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व पेसा सदस्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Extortion of 30 Lakhs in Niwane Gram Panchayat embezzlement of PESA funds case registered against three Nashik Crime )

निवाणे - दह्याने ग्रुप ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२१ दरम्यान पेसा अंतर्गत व शासकीय योजनेत तत्कालीन सरपंच बेबीबाई सोनवणे, ग्रामसेवक भास्कर पुंजाराम बागूल व पेसा सदस्या यशोदाबाई विठोबा माळी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शासनाच्या विविध विकास कामासाठी आलेल्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.

याबाबत निवाणे बाळासाहेब आहेर व संगीता आहेर यांनी ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांतअधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तक्रार करून अनेक महिने उलटले तरी चौकशी सुरु आहे, कारवाई होईल असे उत्तर दिले जात होते.

अखेर बाळासाहेब आहेर व ग्रामस्थांनी १४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचे निवेदन दिल्यानंतर प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांच्या मध्यस्थीने व आश्वासनाने ग्रामसेवक युवराज सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार पेसा अंतर्गत शासकीय योजनेत ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व पेसा सदस्या यांच्याविरोधात कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"निवाणे ग्रामपंचायतीत १४ वित्त आयोग, पेसा व इतर निधीतील कामे तसेच अनेक वर्षांपासून स्मशानभूमी, अंगणवाडी संरक्षण भिंत, स्मशानभूमी संरक्षण भिंत, स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक, यात मोठा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत वेळोवेळी तत्कालीन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी आर्थिक हितसंबंधामुळे गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींकडून अपहार झालेली शासकीय रक्कम वसुल करावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी."

- बाळासाहेब आहेर, ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT