Extreme step taken by farm laborer in Dikshi Block path of angry relatives for 6 hours Nashik News esakal
नाशिक

Nashik News: दिक्षी येथे शेतमजुराने मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल; संतप्त नातेवाईकांचा तब्बल 6 तास रास्ता रोको

रात्री उशिरा ओझर पोलिस ठाण्यात शेतमालकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पहाटे मृतदेहावर दिक्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : दिक्षी येथे राहूल अलबाड ( १९ ) या तरुणाने गुरुवार दि ११ रोजी दुपारी अकराच्या सुमारास दिक्षी गांवातील रमेश टर्ले यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

मयताच्या नातेवाईकांनी शेतमालकावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करावा यामागणी साठी मयताचा मृतदेह रस्त्यावर आणून तब्बल सहा तास दिक्षी सुकेणे रास्ता रोको केला.

रात्री उशिरा ओझर पोलिस ठाण्यात शेतमालकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पहाटे मृतदेहावर दिक्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (Extreme step taken by farm laborer in Dikshi Block path of angry relatives for 6 hours Nashik News )

याबाबत सविस्तर असे की फिर्यादि मयताचे वडिल निवृत्ती अलबड यांच्या फिर्यादी नुसार मुळचा सुरगाणा भागातील राहुल निवृत्ती अलबट हे दिक्षी येथे वास्तव्यास असून मोलमजूरी करून आपल्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

त्याने गांवातील शुभंभ रमेश टर्ले यांचेकडून बहिणीच्या लग्नासाठी चाळीस हजार रुपये टर्ले यांच्याकडून उचल घेतली होती. घटनेच्या दिवशी सकाळी शेतकरी टर्ले हे मयत राहूत यांस नेहमी प्रमाणे सकाळी त्याच्या घरी जाऊन कामावर येण्याचा हट्ट धरला.

त्यावेळी मयताने मी आजारी असल्यान कामावर येऊ शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी टर्ले याने त्यास पैसे फिटेपर्यंत तुला कामावर यावेच लागेल आणि त्यानंतर टर्ले याने त्यास जबरदस्तीने बळजबरीने त्याचे मोटरसायकलवर बसवुन आरोपीताच्या द्राक्षाबागेच्या शेतात घेवुन जावुन त्यास शिविगाळ करुन हातचापटीने मारहाण केल्याने,

त्या मानसिक त्रासास कंटाळुन मयताने टर्ले याचे शेतात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्यास उलट्याचा त्रास होवु लागल्याने त्यास उपचारकामी श्री सेवा हॉस्पीटल ओझर येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचे सांगितले.

शुभम रमेश टर्ले हे मयतास आत्महत्येस प्रवृत्त केले. म्हणून ओझर पोलिस ठाण्यात रास्ता रोको आंदोलनानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना स्थळी उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल भामरे, ओझर पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्याने दिक्षी येथे छावणीचे स्वरूप आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT