Death esakal
नाशिक

Nashik News: नववीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने शाळेत कबड्डीचे सामने असल्याने घरीच होती. परंतु दुपारी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (extreme step taken by ninth grade girl end life by herself Nashik News)

मीना ज्ञानेश्वर पवार (वय १४, रा. साती आसरा कॉलनी, पाझर तलावाजवळ, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत मुलीचे नाव आहे. मीना ही इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. कबड्डीचे सामने असल्याने ती शनिवारी (ता. २३) शाळेत गेली नाही.

दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ती घरात असताना झोपायला गेली. मात्र त्याचदरम्यान, तिने मधल्या रुममध्ये ओढणीने गळफास घेऊन जीवन संपविले. घटना लक्षात येताच तिला काका रमेश पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. गंगापूर पोलिस ठाण्याचे हवालदार डी. डी. सरनाईक यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मीना ही आजी व बाबांच्या घरी वास्तव्यास होती. तिचे आई-वडील हे आजीच्या घरासमोरच राहायला आहेत. मीनाचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT