Nashik Eyes Infection : तालुक्यात डोळ्यांच्या साथीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.
शासकीय आणि खासगी रुग्णालयात या संसर्गजन्य आजारामुळे डोळ्यांची तपासणी करण्यासाठी गर्दी होत आहे. आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अस्वच्छता व वातावरणामुळे या आजाराने हातपाय पसरल्याचे बोलले जात आहे.
डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य असल्याने आरोग्य विभागापुढेही आव्हानच आहे. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, चिपडे येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे न उघडणे, पापण्यांवर सूज येणे, अंधुक दिसणे, आधी विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. (Eye infection started in Dindori taluka call to care rather than panic nashik)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खोकला आणि स्पर्श अशा विविध कारणांनी हा आजार पसरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
शक्यतो काळा चष्म्याचा वापर करावा, दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुणे, डोळ्यात ड्रॉप्स मलम वापरताना हात स्वच्छ धुवावे, डोळ्यांसाठी वापरलेले रूमाल गरम पाण्याने स्वच्छ धुवावे, डोळे आलेल्या व्यक्तीचे कुठलेही साहित्य वापरू नये, शक्यतो घरी राहावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, ज्यांना आजार आहे त्यांनी इतरांपासून दूर राहावे, जीवनसत्वयुक्त आहार घ्यावा, औषधोपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.