सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वावी येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून येणाऱ्या दगू नाना वाघ 50 रा. कहांडळवाडी यांच्या चेहऱ्याला नायलॉन मांजा ने कापल्यामुळे गंभीर जखम झाली.
श्री. वाघ हे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कहांडळवाडी येथून वावीला दळण दळण्यासाठी दुचाकीवरून येत होते. वावी येथील नूतन विद्यालयाजवळ आल्यावर ते गावात वळत असताना पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. (Face cut with nylon manja on Makar Sankranti day Nashik News)
त्यांनी या मांज्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पलीकडच्या बाजूने मांजा ओढल्या जात असल्याने त्यांच्या नाकपुडीपासून हनुवटीपर्यंत चेहऱ्याचा भाग कापला गेला. त्यांच्या गालावर सुमारे पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची व अर्धा सेंटीमीटर खोलीची जखम झाली.
रक्तस्राव होत असल्याने त्यांना स्थानिक रहिवाशांनी मदत करत दवाखान्यात आणले. मात्र जखम खोलवर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सिन्नरला जाण्याचा सल्ला दिला. 108 रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर टाके टाकण्यात आले. जखम मोठी असल्याने सुमारे दहा टाके टाकून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात आले. नायलॉन मांजाने इजा होण्याची वावी येथील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. नायलॉन मांजा वापरास व विक्रीला बंदी असताना देखील राजरोसपणे पतंगबाजांकडे नायलॉन मांजा दिसत होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.