Vijay Dhamal, Senior Police Inspector of Unit One of the City Crime Branch, raided shops in the case of sale of fake accessories of a reputed company on MG Road and found fake accessories. esakal
नाशिक

Nashik Crime: नाशिकमध्ये सापडली ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज; ५ लाखांची बनावट माल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरातील एमजी रोड परिसरात असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज दुकानांमध्ये नामांकित मोबाईल कंपन्यांचे बनावट ॲक्सेसरीजची सर्रासणे विक्री केली असल्याची माहिती मिळताच नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पाच दुकानांवर छापे टाकले.

या वेळी पोलिसांनी तब्बल ५ लाखांचा मोबाईलसाठी लागणारी बनावट ॲक्सेसरीज जप्त केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Fake Apple accessories found in Nashik 5 lakh fake goods seized Nashik Crime)

एमजी रोड येथील मार्केट मोबाईल ॲक्सेसरीजसाठी शहरातच नव्हे तर जिल्हाभर व परजिल्ह्यातही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सुमारे नामांकित कंपन्यांसह सर्वच मोबाईल कंपन्यांचे ॲक्सेसरीज विक्रीसाठी उपलब्ध असतात.

यामध्ये काही नामांकित कंपन्यांचे ॲक्सेसरीज या बनावट असतात. याबाबत पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जात असते. परंतु तरीही येथील बनावट ॲक्सेसरीजचा व्यवसायावर आळा बसू शकलेला नाही.

दरम्यान, ॲपल या नामांकित कंपनीचे बनावट ॲक्सेसरीजही एमजी रोडवरील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती या कंपनीच्या मार्केटिंग विभागाला मिळाली होती.

ॲपल कंपनीच्या ॲक्सेसरीज या महागड्या असून, त्या फक्त त्याच कंपनीच्या डिलरकडे उपलब्ध असतात. असे असताना सदर कंपनीचा बनावट ॲक्सेसरीज कमी किमतीत या विक्रेत्यांकडून विक्री होत असल्याने कंपनीच्या संबंधित विभागाने याबाबत खातरजमा केली.

त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने एमजी रोडवरील प्रधान पार्कमध्ये असलेल्या दुकानांवर छापा टाकली.

यातील पाच दुकानांमध्ये नामांकित कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. यामध्ये बनावट ॲडप्टर, हेडफोन, बॅकप्लग असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी शिवम्‌ सेल्स, पटेल ॲक्सेसरीज, प्रवीण एजन्सीज्‌, शिवशक्ती टेलीकॉम्स, अंबिका ॲक्सेसरीज या दुकानांमध्ये पोलिसांनी कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये छापासत्र राबविले. सदर कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, मुक्तार शेख, प्रवीण वाघमारे आदींनी बजावली.

विक्रेत्यांची मुजोरी

एमजी रोडवर असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेते हे बहुतांशी परप्रांतीय असून त्यांची या क्षेत्रात मक्तेदारीच झाली आहे. ग्राहकांना बनावट साहित्य ते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करतात.

अनेकदा तर ग्राहकांशी अरेरावी करून मारहाणही केली जाते. यापूर्वी अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत. तसेच, बनावट ॲक्सेसरीज प्रकरणी यापूर्वीही येथील विक्रेत्यांविरुद्ध अनेकदा छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

परंतु त्यावर आळा बसू शकलेला नाही. तसेच, पोलिसांकडूनही ठोस कारवाई होत नसल्याने या व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT