Food Adulteration News : गुजरातमधून खासगी ट्रॅव्हल्समधून आलेला तसेच शहरातील दुकानातील छाप्यात सव्वादोन लाखांचा बनावट मावा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत शुक्रवारी (ता. १५) जप्त करण्यात आला.
सणासुदीला वाढणारे मिठाई खरेदीचे प्रमाण लक्षात घेता त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे उघड होत आहे. प्रशासनाने जप्त केलेला मावा हा भेसळयुक्त मावा (Adulterated Mava) असल्याचे समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधून दोन खासगी ट्रॅव्हल्समधून द्वारका परिसरात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेसळयुक्त मावा उतरणार असल्याची माहिती मिळाली होती. (Fake Mawa seized from Gujarat in nashik food adulteration news)
त्यानुसार बलदेव ट्रॅव्हल्स व श्रीविजय ट्रॅव्हल्समधून अहमदाबाद (गुजरात) येथून अन्नपदार्थ वाहतूक करून आणून रॉयल एक्स्प्रेस ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाजवळ उतरविण्यात आला. गुजरातमधून आलेल्या दोन खासगी बसमध्ये आणलेला मावा द्वारका येथील ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात उतरविण्यात येत असतानाच अधिकाऱ्यांनी छापा टाकत मावा जप्त केला.
हा मावा शहरात तयार होणाऱ्या मिठाईत वापरला जाणार होता. त्या माध्यमातून मिठाई विक्रेते मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद यांसारखे माव्यावर आधारित पदार्थ तयार करीत होते. त्यानुसार शहरातील मिठाई दुकानांची तपासणी करण्यात आली.
त्यात प्रामुख्याने से. अनुष्का स्वीट सप्लायर्स, रविकांत रामदास सिंग (जेल रोड, नाशिक) यांच्याकडून स्पेशल बर्फी (श्री कन्हैया)- ११ एचडीपीई बॅग (किंमत ४१ हजार रुपये), मे. डिलिशियन स्वीटस् (श्री श्याम) तीन एचडीपीई बॅग (११ हजार रुपये), हलवा (श्री कन्हैया) पाच बॉक्स (१७ हजार २९० रुपये) असा एकूण ६९ हजार २९० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
त्यानंतर सोनाका अॅग्रो फूड (द्वारका, नाशिक)चे मालक संदेश जे. कासलीवाल यांनी मागविलेल्या मिठाईच्या साठ्यातून रिच स्वीट डिलाईट अनलॉग (राधे)चा २९८ किलो व २५० किलो (७४ हजार ५०० रुपये) इतका साठा जप्त केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सोमाभाई कल्पेश नवरतन गुप्ता (रा. गुरुगोविंद महाविद्यालयाजवळ, इंदिरानगर) यांच्याकडून गोकुळ (पारंपरिक गोड पदार्थ)चा १४ पॅकेट्स, १४८ किलो (२९ हजार ६०० रुपये) इतका साठा नमुना घेऊन जप्त केला. याबरोबरच लच्छाराम मानाराम चौधरी, मे. महालक्ष्मी स्वीट्स (जेल रोड, नाशिक) यांनी मागविलेल्या कलाकंद स्वीट्सचा नमुना घेत ५८ किलो (१३ हजार ९२० रुपये) इतका साठा जप्त केला. एकूण दोन लाख १० हजार ९१० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत सहआयुक्त (अन्न) सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे, मनीष सानप व नमुना सहाय्यक विकास विसपुते, अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, उमेश सूर्यवंशी, अमित रासकर, प्रमोद पाटील यांनी भाग घेतला.
हा मावा नक्की कुणासाठी?
या घटनेतून नाशिकमध्ये भेसळयुक्त मावा विक्री केला जात असल्याचे स्पष्टे झाले आहे. त्या माध्यमातून दुकानांमध्ये मिठाई बनविण्याचे काम होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ असल्याचे अन्न-औषध अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले. हा मावा कोणासाठी आणला होता? याचाही तपास करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.