fall in market price of tomatoes esakal
नाशिक

Nashik Tomato Rates Fall: टोमॅटोच्या बाजारभाव दरात घसरण; सरासरी 60 अन सर्वाधिक 80 रुपये रूपये भाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rates Fall : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो बाजारभाव दर दिवसगणीक घसरण दिसून येत आहे. मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.

गुरूवार (ता.१४) रोजी झालेल्या लिलावात प्रती क्रेटला सरासरी साठ रुपये, सर्वाधिक ऐंशी रूपये भाव मिळत आहे. (Fall in market price of tomatoes average price Rs 60 maximum Rs 80 nashik)

शेतकरी कधी अवकाळी पाऊस धोका देतो , तर कधी आसमानी तर कधी सुलेमानी नेहमीच संकटांनी घेरलेला असतो. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादन झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले होते.

अक्षरशः बाजारभाव कमी मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आंदोलन देखील केले होते. यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती परिणामी बाजारभाव चांगला मिळाला होता.

सद्यस्थितीत नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव, दोडी - दापुर, मुसळगाव , गुळवंज, दातली, खोपडी, समशेर पुर याभागातून टोमॅटो येत आहे.गेल्या चार पाच दिवसांपासून आवक वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुरूवार (ता.१४) रोजी झालेल्या लिलावात टोमॅटो प्रती कॅरेटला सरासरी साडे साठ रुपये तर सर्वाधिक ऐंशी रुपये बाजारभाव मिळाला जवळपास पंधरा हजार ते वीस हजार नऊशे पंच्यांशी कॅरेट्स आवक झाली आहे.

"टोमॅटो फक्त तीन रुपये किलो"

मागील महिन्यात टोमॅटो आवक ही पाच ते आठ हजार दरम्यान होती. आज रोजी आवक वाढली असून जवळपास वीस हजार कॅरेट झाली आहे. एका कॅरेट मध्ये वीस किलो टोमॅटो असतो सरासरी मिळालेल्या बाजार भाव बघता टोमॅटो फक्त तीन रुपये किलो जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT