Nashik News : घरातला कर्तापुरुष सोडून गेला की कुटुंब उघड्यावर येते...अशावेळी आधार मिळतो तो नातेवाइकांचा! मात्र या आधारालाही मर्यादा असतात म्हणून की काय मित्र नावाचे नातेवाईकही मदतीचा हात पुढे करतात...याचा अनुभव घेतला आहे तो ममदापूर येथील (स्व) रमेश कदम यांच्या कुटुंबीयांनी.
रमेश कदम यांच्या अपघाती निधनानंतर जुन्या मित्रांनी तब्बल एक लाख तीस हजार रुपयांच्या मदतीचा हात त्यांच्या कुटुंबीयांना दिला आहे. (family of friend at mamdapur lost in accident gets help worth millions Nashik News)
तालुक्यातील ममदापूर येथील रहिवासी असलेले रमेश रामचंद्र कदम हे बाभूळगाव येथील कृषी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. महिन्यांपूर्वी रात्री घरी परतत असताना राजापूरजवळ त्यांचा अपघात होऊन उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
रमेश कदम यांनी आजवर अनेक विद्यार्थी घडवले असून गेल्या पंधरा वर्षात एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली होती.
शांत, सुस्वभावी अन् प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेले कदम यांच्या अचानक जाण्याने त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे आजी माजी विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. यातून सावरत या सहकाऱ्यांनी कदम यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जमा करण्याचे ठरवले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकाऱ्यांना आवाहन करत पाहता पाहता लाखो रुपयांची रक्कम जमा झाली. सुमारे ५० हुन अधिक कृषी मित्रांनी पै-पै जमा करून एक लाख तीस हजार कदम यांच्या कुटुंबीयांना मदत स्वरूपात देण्यात आली.
यावेळी रमेश कदम यांच्या कृषी विषयक आठवणी जागवत त्यांच्या घराजवळ सहकाऱ्यांनी आंबा, जांभूळ, पेरू आदी झाडांचे वृक्षारोपण केले. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय धात्रक, दत्तात्रय वैद्य, नीलेश साबळे, देवचंद शिंदे, विजय भोरकडे, दत्ता पाटील, शंकर सोनवणे, दीपक कदम आदींनी पुढाकार घेतला.
"सोज्जवळ व शांत स्वभावाच्या विद्यार्थी प्रिय आणि कृषी विषयक आपुलकी जपणाऱ्या मित्राचे अपघाती जाणे सर्वांनाच वेदनादायी होते. त्यांच्या कुटुंबीयांना फूल न फुलाची पाकळी मदत करावी या हेतूने सर्वांनी मिळून हा मदतीचा हात दिला."
-दत्तात्रय वैद्य, संचालक, खरेदी विक्री संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.