farmer demand governor for electricity and water to farm during day nashik news 
नाशिक

Ramesh Bais: आमच्या शेतीला दिवसा वीज-पाणी द्या; शेतकऱ्यांनी राज्यपालांकडे मांडले गाऱ्हाणे

सकाळ वृत्तसेवा

Ramesh Bais : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. यातच शेतीला दिवसा वीज मिळत नाही. ग्रामीण भागात आठ-आठ तास वीज नसते.

शेतीला दिवसा वीज व पाणी मिळावे, शेतीला जोडधंडा मिळावा असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोर मांडले.

शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आलो आहे, याबाबत सरकारला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (farmer demand governor for electricity and water to farm during day nashik news)

राज्यपाल बैस मंगळवारी (ता. २१) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. कुशेगाव (ता. इगतपुरी) येथे जिल्हा कृषी विभागाकडून ड्रोनद्वारे नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक राज्यपाल बैस यांच्यासमोर करण्यात आले. ड्रोनद्वारे फवारणी करताना किती खर्च येतो, शेतकऱ्यांची किती बचत होणार आहे, फायदा कसा होईल याबाबत त्यांनी इफ्को अधिकाऱ्यांना विचारणी केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्री. बैस यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी अर्धा तास संवाद साधला.

शेतकरी भास्कर मते यांनी सेंद्रीय शेतीचा अनुभव सांगत, रासायनिक खतांचा वापर करीत नसून, सर्व पिके सेंद्रीय पद्धतीने घेतली जातात, असे सांगितले. त्यावर बैस यांनी रासायनिक खते वापरता असता किती उत्पादन घेत होते, सेंद्रीय खते वापरताना किती उत्पादन मिळते, याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतले. त्यानंतर, मते यांनी शेतीच्या समस्या मांडण्यास सुरवात केली. शेतीमालाला भाव मिळत नाही, विजेची समस्या मोठी आहे, दिवसभर वीज नसते, रात्री वीज मिळते, त्यानंतर पिकांना पाणी द्यावे लागते.

त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र केदार यांनी आधुनिक शेतीबाबत सांगत, वीज-पाणी महत्त्वाचे आहे; परंतु, ते वेळात मिळत नाही. शेती व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही. जोड व्यवसायाला सरकारने सहाय्य केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली. त्यावर राज्यपाल बैस यांनी मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. राजकारणात येण्यापूर्वी मी शेती करीत होतो. शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. मात्र, आता शेती व्यवसाय बदलत आहे.

मजूर मिळत नाही, हे वास्तव आहे. शेती, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राज्य सरकारला योग्य त्या सूचना करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, राज्यपाल भवनच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सावकारांकडून कर्ज घेतले का

दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांप्रती असलेला महत्त्वाचा प्रश्न केला. तुम्ही सावकारांकडून की राष्ट्रीय बॅंकांकडून कर्ज घेतले आहे का, अशी विचारणा केली. त्यावर शेतकऱ्यांनी नाही, असे सांगितले. तसेच, खते खरेदी कोठून करतात असा प्रश्न केला. खासगी कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सायकलवर शाळेत जा

राज्यपाल बैस यांच्या हस्ते उमेश सराई, गोरख सराई, सागर सराई, समाधान बुरबडे व सोमनाथ सराई या पाच लाभार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल वाटप केल्यावर राज्यपास बैस यांनी लाभार्थ्यास शाळेत कोणत्या इयत्तेत शिकत आहे, असे विचारले, तसेच आता सायकल मिळाली आहे. सायकलवर शाळेत जा व मोठे व्हा, असा सल्ला दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT