नामपूर (जि. नाशिक) : गेल्या तीन वर्षांपासूनची नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव, झालेले नुकसान, शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यंदाही खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे नैराश्याला कंटाळून बाभळीच्या झाडाला केबल वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.
शेती हाच एकमेव आधार होता
भालचंद्र (बाबा) माणिक पवार (वय ५३) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
काकडगाव शिवारात गट क्रमांक १४४ मध्ये भालचंद्र पवार यांची वडिलोपार्जित सुमारे ८४ गुंठे सामाईक शेती आहे, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे नामपूर येथील गट क्रमांक १२०३ आणि ११८७ मध्ये त्यांची शेती आहे. त्यानुसार अनेक वर्षांपासून मृत भालचंद्र पवार पूर्णपणे शेती पाहत होते. काही दिवसांपासून कोणत्याच पिकाला भाव नसल्याने शेतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यंदाही खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यांच्यावर नामपूर येथील सहकारी संस्थेचे कर्ज असल्याची पंचनाम्यात नोंद आहे. शनिवारी (ता. २३) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. मुलगा विशालच्या ही घटना लक्षात आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.
माजी सरपंच अशोक पवार, प्रमोद सावंत यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक भदाणे, मंडळ अधिकारी सी. पी. अहिरे, तलाठी राजू काष्टे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
आत्महत्याग्रस्त पवार कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी माजी सरपंच प्रमोद सावंत, संजय पवार, अशोक पवार, अविनाश पवार, हेमंत पवार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.