नाशिक/कसबे सुकेणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारने त्वरित कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास स्व शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतर्फे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना सडके कांदे पाठविण्यात येणार आहेत. संघटनेच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात चाळींमध्ये सडला असून कांदा सडण्याचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. तर कांद्याचा संपूर्ण उत्पादन खर्च जवळपास ५० टक्के आहे म्हणजे शेतकऱ्यांना फक्त २० टक्के नफा होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने हा नफा देखील आता होणार नाही. त्यामुळे जर बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर चाळीमध्ये सडलेले कांदे वाणिज्य मंत्र्यांना पाठवून अगोदरच कांद्याचे किती मोठे नुकसान झाले आहे व आता कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन आणखीनच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे हे दर्शवण्यासाठी हा निर्णय शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद
यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे,तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोराडे, सांडू भाई शेख, संतु बोराडे, शंकर पुरकर, अशोक भंडारे, के.डी मोरे, भगवान बोराडे, केदु बोराडे, वाळू बोराडे , अण्णा गायकवाड, सुखदेव पागेरे, सोपान बोराडे, शिवाजी बोराडे, विष्णूपंत बोराडे, नामदेव बोराडे, मोतीराम बोराडे, दगू गवारे, सुदाम बोराडे, अशोक बोराडे ,विठ्ठल बोराडे, संजय पारधे, किरण गवारे, उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.