Onion Rate News esakal
नाशिक

Onion Rate Fall: कांद्याच्या दरात घसरणीने शेतकरी संतप्त; मुंगसे उपकार्यालयात कांदा फेकून नोंदविला निषेध

सकाळ वृत्तसेवा

Onion Rate Fall : बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार केंद्राच्या कांदा खरेदी-विक्री केंद्रावर मंगळवारी (ता.१३) झालेल्या लिलावात शेतकऱ्याचा कांदा लिलावात अत्यल्प बोलीने गेल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने मुंगसे उपकार्यालयात व महामार्गावर कांदा फेकून निषेध आंदोलन केले.

बाजार समिती प्रशासन व पोलिसांनी मध्यस्थी करत संबंधित शेतकऱ्याला प्रति क्विंटल शंभर रुपये दर व्यापाऱ्यांशी चर्चा करून वाढवून दिल्यानंतर हा प्रश्‍न निकाली निघाल्याचे उपसभापती विनोद चव्हाण यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. (Farmers angry with fall in onion price protest registered by throwing onions at Mungse sub office nashik news)

मुंगसे केंद्रावर मंगळवारी दुपारी कांदा लिलावात सरासरी कांद्याचा प्रति क्विंटल दर ८०० ते १००० रुपये होता. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये हा दर १००० ते १२०० रुपये होता. दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाले.

त्यातच निमगुले (ता.मालेगाव) येथील शेतकरी गणपत कदम यांचा कांदा २७४ रुपये क्विंटल प्रतिदराने गेला. त्यामुळे श्री. कदम अतिशय उद्विग्न झाले. यातच काही शेतकऱ्यांना लासलगाव, पिंपळगाव व अन्य केंद्रावरील बाजारभाव व लिलाव पुकाराचे दर समजले.

त्यामुळे काही तास विचार केल्यानंतर संतप्त झालेल्या कदम यांनी रात्री अचानक टेम्पो उपकार्यालयाच्या समोर आणून कार्यालयात कांदा फेकला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यानंतर मुंगसे केंद्राचे कर्मचारी व समितीचे सचिव अशोक देसले यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. शेतकऱ्याने उपकार्यालयात कांदा फेकल्यानंतर काही कांदा महामार्गावरही फेकत निषेध नोंदविला.

यानंतर तालुका पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस, बाजार समिती प्रशासन यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून संबंधित शेतकऱ्याला शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा दर वाढवून दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT