17 tractor summer onion storage  esakal
नाशिक

Onion Storage : उन्हाळ कांदा विकण्यापेक्षा साठवणूक बरी! चांगल्या भावाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी भागात यंदा अवकाळीच्या रूपाने का होईना पावासने मेहेरबानी केली. ती काहीशी नुकसानकारक ठरली असली तरी काहीशी लाभदायकही ठरली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने तालुका आज पाणीदार झाला आहे. (farmers are storing summer onion rather than selling it nashik news)

त्यामुळे रब्बी हंगामात अवकाळी कळा झेलत उन्हाळी कांदा लागवडीचे प्रमाण वाढले. अवकाळीने झालेले नुकसान बाजूला ठेवत शेतकरी आहे तो चांगला कांदा व्यवस्थित निसणी करीत साठवणूक करीत आहे. यंदा कमतरतेमुळे याच कांद्याला चांगला भाव मिळेल अशी त्याला अपेक्षा आहे.

सध्या भर उन्हात उन्हाळी कांदा काढणीचा अन् साठवणूक सुरू आहे. कांदा पिक जोरात असताना कांदाच्या गाभ्यात पाणी शिरले. पण जो कांदा वाचला पावसात भिजून तग धरला, तो कांदा समाधानकारक भाव नसल्यामुळे साठवणूक करण्याकडे प्रयत्न सुरू आहेत. सिन्नरच्या पूर्वेकडील गावांमध्ये विशेषता देवनदी खोऱ्यात यंदा उन्हाळी कांदा हंगाम तीन टप्यात झाला आहे.

त्यांचे मुख्य कारण पावसाचे वाढलेले प्रमाण आहे. आज मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. साठवण बंधारे, नाल्यावरील बंधारे यांना पाणी आहे. कांदा लागवड मुबलक होती, पण कांदा पोसण्यासाठी हवामानाने साथ दिली नाही. त्यामुळे कांदा फवारणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खर्चिक पीक घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अवकाळी पावसाचा सामना करत उन्हाळी कांदा खळ्यावर ठेऊन आता कांदा चाळीत साठवणुकीचा हंगाम सुरू आहे. गोलटी, गोलटा मध्यम, मोठा कांदा असे प्रकार करून वेगवेगळ्या पध्दतीने साठवणूक केली जात आहे. बहुतेक ठिकाणी दुसरा टप्यातील कांदा चाळीत साठवला, तो सडण्याच्या घटना घडत आहेत.

पूर्व व पश्चिम भागात उन्हाळी कांदा काढणी साठवणूक वेगवेगळ्या पध्दतीने केली जात आहे. ज्या तुलनेत उन्हाळी कांदा लागवड वाढली, त्या तुलनेत कांदा काढणी व साठवणूक करून कांदा कमी दिसत आहे. असे असेल तरी अवकाळी पाऊस होऊन चांगला कांदा शिवारात साठवणूक करताना दिसत आहेत.

चमकदार रंग, आकार अन् वजन आहे असा कांदा किमान चार महिने चाळीत टिकू शकेल. त्यामुळे कांदा साठवणूक सुरू आहे. वडांगळी, खडांगळी, किर्तांगळी, घंगाळवाडी, निमगाव, सिन्नर, पिंपळगाव मेंढी, चोंढी, शहा, पुतळेवाडी, पंचांळे दातली, पांगरी, भोकणी, दोडी, नांदूर, दापूर, मऱ्हळ, पाथरे, देवपूर, धारणगाव, फर्दापूर यांच्यासह पश्चिम भागात उन्हाळी कांदा साठवणूक सुरू आहे.

"यंदा उन्हाळी कांद्याचे सरासरी उत्पन्न गतवर्षासारखे मिळाले नाही. काढणीला अवकाळी पाऊस झाला. पण कांद्याचा रंग, वजन चांगले आहे. त्यामुळे सतरा ट्रॅक्टर कांदा नव्याने उभारलेल्या चाळीत साठवत आहे." - जितेंद्र ठोक, युवा शेतकरी, खडांगळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT