sugarcane Crop esakal
नाशिक

नाशिक : उसतोड होत नसल्याने शेतकरी दिशाहिन

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : नापिक होत चाललेल्या जमिनीत एकमेव उसाचे पीक (Sugarcane crop) येते, ऊस लागवड केल्यावर चार पैसे मिळतात, पण त्या उसाचीच तोड होत नसल्याने आता आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कर्ज काढून कुटुंब चालवले, ते कर्ज भरण्यासाठी सावकार, बँका तगादा लावत आहेत. ऊस तोडणी करण्यासाठी नोंदणी केलेल्या कारखान्यात चकरा मारून जीव कासावीस झाला आहे. आत्ता कारखाना संचालक उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे आत्महत्या कऱण्याशिवाय पर्याय नाही. या आत्महत्येला कारखाना जबाबदार राहील असे पत्र तामसवाडी येथील शेतकरी दत्तू आरोटे यांनी रानवड साखर कारखान्याचे (Ranwad Sugar Factory) संचालक रामभाऊ माळोदे यांना पाठविले आहे. (Farmers are worried as there is no harvest of sugarcane Nashik Agriculture News)

गोदाकाठ परिसरात अजूनही हजारो हेक्टर ऊस तोडणी होत नसल्याने शेतात उभा आहे. अशोक बनकर पतसंस्थेने रानवड कारखाना भाडेतत्वावर चालू केला, रानवड कारखाना उशिरा सुरु झाला, मात्र ऊस लागवड आणि कारखाना गाळप क्षमता याचा ताळमेळ बसत नसल्याने नोंद केलेल्या उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असे पत्रात म्हटले आहे.

रानवड कारखाना सुरु होत असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी ऊस नोंद इतर कारखान्यात केली नाही. आता जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील इतर कारखाने ऊस तोडणी करत नाही आणि रानवड आज उद्या करत आहे, वेळ जास्त होत आहे. मजूर घराकडे परतू लागले आहेत, त्यामुळे आपला ऊस तोडला जाणार नाही अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळे तो अधिकच चिंतेत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलत आहे असे पत्रात म्हटले आहे. दत्तू आरोटे यांची सर्व शेती ऊसाची असल्यामुळे इतर पीक घेता येत नाही, आर्थिक समस्या केवळ उसाच्या पैशावर सुटतात, त्यात तोडणी होत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

"रानवड कारखाना सुरु झाल्याने आशादायी चित्र निर्माण झाले होते, पण नोंदणी केलेला ऊस वेळ निघून गेली तरी तोडणी होत नाही. कारखान्यात अनेक वेळा चकरा मारल्या, आमदार दिलीप बनकर व कार्यकारी संचालक रामभाऊ माळोदे यांना सांगितले तरीही ऊसतोड झालेली नाही. ऊस तोडणी होणार नव्हती तर नोंदणी करायला नको होती. आता माझ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही."

- दत्तू आरोटे, ऊस उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT