onion esakal
नाशिक

कांदा तेजीत असतांनाच धाडसत्र कसे? शेतकरी चिंताग्रस्त

सकाळ डिजिटल टीम

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात कांद्याचे मोठे क्षेत्र नसताना पिंपळगाव बसवंत व लासलगाव या बाजारपेठा आशिया खंडात कांद्याची राजधानी म्हणून ओळखल्या जातात. संचालक मंडळाचे धोरण व शेतकऱ्यांचा विश्‍वास यामुळे हा नावलौकीक मिळाला. यासह सिंहाचा वाटा राहीला तो व्यापारी वर्गाचा. जिल्ह्यातील इतर बाजार समितीच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी दर दिल्याने शेतकरी तीन-चार बाजार समिती ओलांडून पिंपळगाव बसवंत, लासलगावला पसंती देतात. असे असताना आयकर विभागाच्या छाप्यामुळे कांदा दर घसरून शेतकऱ्यांचेच नुकसान होते. कांद्याचे दर तेजीत असतानाच हे धाडसत्र होत असते, असा इतिहास आहे. कांद्याचे दर पाडण्याचा तर हा उद्योग नाही ना, अशी शेतकऱ्यांना शंका उपस्थित होत आहे.

पिंपळगावातील सहा व्यापाऱ्यावर आयकर विभागाने छापे टाकले. कांदा पाच हजार रूपये प्रतिक्विंटलकडे झेप घेत असतानाच हे छापे पडल्याने त्याचा परिणाम दर घसरणीत झाला. दरवाढीला मोठा ब्रेक लागल्याने शेतकरी नाराज झाला आहे. आयकर विभागाचे छापे यापूर्वीही शहरातील काही कांदा व्यापाऱ्यांकडे झाले. पण निष्पण्ण काय झाले हा कळीचा मुद्दा आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयावर तपासणी सुरूच होती. आयकर भरण्यात व्यापारी लपाछपी करीत असतील तर कारवाई जरूर व्हावी. पण उगाच वेठीस धरून कांद्याचे दर पाडत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचा एक रूपयाही बाकी ठेवलेला नसताना ही कारवाई म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दोन पैशावरही डोळा असाच अर्थ काढला जात आहे.


येवला : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की पिंपळगाव बसवंत, लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडतात. छापे पडले की कांदा भावात मोठी घसरण होते, यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत आहे. ही पद्धत अयोग्य असून ती तातडीने थांबवावी अशी मागणी येथील माजी आमदार मारोतराव पवार यांनी केली आहे.

शेतकरी नेहमीच तोट्यात असतो, शेतीत गुंतवलेले भांडवल मिळणे अनेकदा त्याला कठीण होऊन जाते. या वर्षी पिके जोमात होती त्यावेळेस अतिवृष्टी होऊन पाण्यात पिके अक्षरशः सडली. अशा स्थितीत मिळणारा वाढीव भाव थोडासा आधार देणारा असतो. मात्र त्यातही छापेमारी करून बाजारपेठ विस्कळीत करण्याचा प्रयत्न होत असेल तर शेतकऱ्यांवर हा दिवसाढवळ्या होणारा अन्याय आहे. मागील आठवड्यात चार हजाराच्या दरम्यान कांद्याचे भाव पोहोचले असतानाच छापे पडल्याने भावात हजार ते दीड हजारापर्यंत घसरण झाली आहे. व्यवहारांच्या नियमबाह्यतेचे समर्थन करणार नाही पण नेमकी दरवाढ झाल्यावरच का छापेमारी होते याचे उत्तर अधिकाऱ्यांनी व राज्यकर्त्यांनी देखील शेतकऱ्यांना द्यायला हवे. हा प्रकार नियमितपणे सुरू राहिल्यास शेतकरी होणाऱ्या अन्यायाविरोधात नक्कीच रस्त्यावर उतरतील असेही पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT