Cultivation of Millet : गाव व परिसरात खरीप व रब्बी पिकाला अवकाळी पाऊस व गारांचा फटका बसला आहे. यामुळे ऐन खरीपात शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावला गेला.
त्यामुळे रब्बीची अवस्था पाहून आणि गहू, कांद्यापेक्षा बाजरीला कमी पाणी लागत असल्याने कसमादे भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीची लागवड केली. (farmers choice for summer millet Cultivation of bajara in many areas in Kasmade nashik news)
बाजरी पिकाला इतर पिकांपेक्षा कमी खर्च येतो. उन्हाळ्यात रोग किडींचा प्रादुर्भाव प्रमाण कमी असतो. त्यामुळे कसमादे पट्ट्यात अनेक भागात बाजरीचे पीक दिसते. सध्या बाजरी पक्व होण्याच्या मार्गावर आहे.
बाजरीही बेमोसमी पावसात सापडली मात्र दाणे भरण्यासाठी पावसाचा लाभच झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. खरिपात बाजरीचे हे पीक परवडत नाही. बाजरीचे बाजारभाव दरही कमी असतात. त्यामुळे आर्थिक नियोजन कमी होते. तेवढाच क्षेत्रात कांदा, भाजीपाला, कापूस, मका जास्त पैसे देऊन जातात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कसमादे पट्ट्यात बाजरीच्या भाकरीला अधिक प्राधान्य आहे. हंगामात इतर राज्यातून आलेली बाजरीची खरेदी करतात मात्र बाजरीचा रंग हिरवा असला तरी ती खाण्यास बेचव लागते. त्यामुळे शेतकरी घरगुती बाजरी शोधतो.
घरगुती बाजरीला सध्या पायलीला दोनशे रुपये ते दोनशे वीस रुपये भाव आहे. दोन्ही हंगामात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला म्हणून तो उन्हाळी बाजरी पिकाकडे वळला आहे. अनेक भागात बाजरीचे चांगले पीक दिसून येत आहे. शेतकरी बाजरीचे पीक घरात येण्याची वाट पाहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.