A farmer from Khuntewadi (T. Deola) stuffed onion. esakal
नाशिक

Nashik Onion Rates : शेतकऱ्यांची कांदाविक्रीबाबत संभ्रमावस्था! भाववाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rates : उन्हाळ कांद्याचे भाव आज ना उद्या वाढतील, या आशेने कसमादे भागातील शेतकरी मोठ्या महत्प्रयासाने उन्हाळी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहेत. काहींनी पलटी मारत पुन्हा कांदा चाळींमध्येच साठविला आहे.

परंतु कांद्याचे भाव थोडेसे वाढले आणि पुन्हा कमी झाल्याने शेतकऱ्यांची कांदाविक्रीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आज ना उद्या कांद्याचे भाव वाढतील, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. (Farmers confused about onion sales Farmers attention to price increase nashik)

कांदा हे कसमादे भागातील प्रमुख नगदी पीक आहे. मागील वर्षीही उन्हाळ कांद्याला विशेष भाव मिळाला नव्हता. या वर्षी बऱ्याच भागातील कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने शिल्लक कांद्याला भाव मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता.

परंतु या वर्षी वाढणार असे वाटत असतानाच तो कमी-जास्त-कमी असा हेलकावे खात असल्याने कांदा आता विकावा की नंतर, अशी द्विधा मनःस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे पीक घेतले. भाववाढीच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला. मागील महिनाअखेरीस १५००-१६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता; पण आता पुन्हा कमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे. कांद्याचे वजन दिवसेंदिवस घटत असून, काही चाळीतील कांदा खराब होऊ लागला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कांदाभावबाबत व्यक्त होत असलेली मते व निरीक्षणे :

- ऊस, डाळिंब कमी झाल्याने कांद्याचे बंपर उत्पादन

- कांदाचाळींच्या संख्येत दर वर्षी होत असलेली मोठी वाढ, त्यामुळे कांद्यांची साठवणूक क्षमता वाढली

- नाफेडची कांदा खरेदी शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर याबाबत शंका

- कांद्याच्या आवकेत दिवसागणिक वाढ

- कांदा निर्यातीला पडत असलेल्या मर्यादा

- आगामी लोकसभा निवडणुकीमुळे भाववाढीची अपेक्षा, त्यामुळे शेतकऱ्यांची ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका

- कांदा आता विकावा की नंतर, याबाबत शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती

"शासनाने कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाबाबत गांभीर्य दाखवत हमीभावासाठी व निर्यातीसाठी आग्रही असावे. महाराष्ट्राचे लोकजीवन शेतीवर अवलंबून आहे, मात्र शेतीकडे व शेतमालाच्या बाजारभावाकडे शासन दुर्लक्ष करत आहे, ही खेदाची बाब आहे."

-भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, सुभाषनगर, ता. देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT