MLA Dilip Borse, Tehsildar Jitendra Ingle-Patil, Lalchand Sonwane etc. while discussing with the farmers at the place where the maize stack was set on fire by an unknown person. esakal
नाशिक

Nashik News : खमताणेत शेतकऱ्यांची मक्याची गंजी पेटवली; 8 लाखांपेक्षा जास्त नुकसान

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : खमताणे (ता. बागलाण) येथील शेतकऱ्यांनी अर्धा एकर क्षेत्रात साठवून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला सोमवारी (ता. २) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत आग लावली.

या भीषण आगीत जनावरांचा संपूर्ण चारा जळून खाक झाल्याने आठ लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. (Farmers corn pile set on fire in Khamtane More than 8 lakhs in damages Nashik News)

खमताणे येथील नवेगाव रस्त्यावरील धर्मा नानाजी इंगळे, विजय दयाराम इंगळे, वसंत दयाराम इंगळे, वाल्मीक रामदास इंगळे या पशुपालक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पंचक्रोशीतील मका उत्पादक शेतकऱ्यांकडून दुग्ध व्यवसायासाठी पाळलेल्या गायी म्हशी व लहान मोठ्या जनावरांसाठी प्रती ट्रॉली चार हजार रुपये प्रमाणे सुमारे १६५ ट्रॉली ट्रॅक्टर मक्याचा कोरडा चारा खरेदी केला होता.

लवकरच यंत्राच्या सहाय्याने चाऱ्याची ते कुटी करून साठवणूक करणार होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अर्धा एकर क्षेत्रात साठवलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लावली आणि तेथुन पळ काढला. यावेळी चिखलाने माखलेल्या पाऊलखुणांवरुन ही आग कुणीतरी अज्ञाताने लावल्याचे निदर्शनास येत होते.

यानंतर उफाळलेल्या आगीचा डोंब इतका प्रचंड होता की दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत त्याची दाहकता दिसत होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ दाखल होऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दरम्यान, सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, जेसीबी मशीन आणि शेकडो शेतकऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होते. महावितरण कंपनीने तत्काळ विजपुरवठा सुरळीत करून स्थानिक वीज पंप सुरू करण्यास मदत केली. मंगळवारी (ता. ३) सकाळी दहापर्यंत आग धुमसत होती.

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन केले. तहसिलदार श्री. इंगळे यांनी जागेवर महसुली पंचनामे करण्याचे आदेश देत अधिकाधिक आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. आग लावणाऱ्याचा शोध घेण्यासाठी श्‍वानपथक मागवून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

"अल्पभूधारक शेतकऱ्यांचा संपुर्ण कोरडा चारा जळुन खाक झाल्याने लहान मोठ्या जनावरांची उपासमार होणार असून ती टाळण्यासाठी महसुल, कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडा चारा उपलब्ध करून द्यावा. तसेच तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा."
-कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT