Sambhaji Pawar and office bearers discussing with the farmers who are on hunger strike in front of the Irrigation Office. esakal
नाशिक

Nashik News : पालखेड पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच; शेतकरी आक्रमक

वितरिका क्रमांक ४६ ते ५२ ला पालखेड डावा कालव्याचे शेतीसिंचनासाठी पाणी सोडावे, यासाठी शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : वितरिका क्रमांक ४६ ते ५२ ला पालखेड डावा कालव्याचे शेतीसिंचनासाठी पाणी सोडावे, यासाठी शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.

पाटबंधारे विभागाच्या एकही अधिकारी दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळाकडे फिरकला नाही. (Farmers hunger strike continues for Palkhed water Aggressive farmers Nashik News)

सुरेगाव, देवळाणे, देवठाण, बोकटे, खामगाव गवंडगाव, अंदरसूल येथील सुमारे १५० शेतकरी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.

मंगळवारी (ता. २३) चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. पालकमंत्री दादा भुसे यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेतली होती.

मंत्री भुसे यांनी पालखेड विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. आवर्तनात अधिक पाणी दिल्याने पालखेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी २३ पूर्वीच बंद केले.

यामुळे शेतकरी संतप्त झाले. भाजपच्या अमृता पवार यांनी विंचूर परिसरातील चारी क्रमांक २५ व २८ चे गेट खोल्यामुळे ४६ ते ५२ ला पाणीपुरवठा झाला नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

मात्र, अमृता पवार यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन अधिकारी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहे, असे स्पष्टीकरण गवंडगाव येथील बैठकीत दिले. आम्हाला पाणी देण्यासाठी तुम्ही मदत करा, असे आवाहन शेतकऱ्यांनी केल्यानंतर गुरुवारी उपोषणस्थळी अमृता पवार आल्या होत्या.

शिवसेना नेते संभाजी पवार यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी अधिकारी स्तरावर पाठपुरावा केला.

बाळासाहेब लोखंडे, तहसीलदार आबा महाजन, महेंद्र काळे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT