Farming esakal
नाशिक

Nashik : अल्पभूधारक शेतकरी, नोकरदारांना खरीपपूर्व मशागत डोईजड

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कसमादे परिसरात खरीपपूर्व (Pre-Kharif) मशागतीच्या कामांना वेग आला आहे. सूर्यनारायणाचा प्रकोप व उकाडा कायम असल्याने कमी वेळात खरीपपूर्व मशागतीची तयारी करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मोठे बागायतदार व यंत्रसामग्री असलेले शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले असताना अल्पभूधारक शेतकरी (Less land Farmers) व शहरातील नोकरदार मात्र गावाकडील शेती करणाऱ्यांना खरीपपूर्व मशागत इंधन दरवाढ (Fuel price Hike), महागाई (Inflation), मजूर टंचाई (Labour Shortage) यामुळे डोईजड झाली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांसाठी संबंधितांवर विनवणी करण्याची वेळ आली आहे. जादा दर देऊनही वेळेवर कामे मार्गी लागतील की नाही, या शंकेने त्यांना ग्रासले आहे. (Farmers in trouble due Fuel price hike inflation labor shortage Nashik Agriculture News)

मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वातावरणातील बदल मान्सूनचा पाऊलखुणा उमटत आहे. तशी खरीपपुर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगीनघाई सुरु आहे. खते, बियाण्यांची तयारी करावी लागत आहे. खरीपासाठी शेत तयार करताना नांगरणी, वखरणी, बांध बांधणी, खत टाकणे, खत पसरविणे, बेले पाडणे अशी विविध कामे करावी लागत आहे. त्याचवेळी घरातील कारभारी खते व बियाणे खरेदीच्या नियोजनात व्यस्त आहे. या सर्व कामांसाठी एक ते पाच एकर शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. कमी शेतीसाठी बैलजोडी परवडत नाही. खरीपाचा हंगाम तोंडावर आला असताना भाडे तत्वावर यंत्रसामग्री मिळत नाही. अशी त्यांची स्थिती झाली आहे. गावी असलेले अल्पभूधारक किमान अडजी- पडजी करुन ‘एकमेका सहकार्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेजारच्या शेतकऱ्याला सहकार्य करुन नांगरणी, वखरणीसाठी विनावण्या करीत आहेत. तथापि नोकरदार असलेले व हौसेपोटी गावाकडे शेती करणाऱ्यांना याच कामासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खरीपपूर्व कामांसाठी अतिरिक्त मोबदला देऊनही कामे होत नसल्याची स्थिती आहे. या हंगामात प्रामुख्याने मका, कपाशी पाठोपाठ बाजरी व भुईमूग लागवड होणार आहे. यासाठी बियाण्याचे खात्रीपुर्वक वाण मिळावे याकडे शेतकऱ्यांचा कटाक्ष आहे.

खरीपपूर्व मशागतीचे दर

नांगरणी - ३ हजार ते ३ हजार २०० रुपये

वखरणी - १३०० ते १५००

खत भरणे - ७०० रुपये प्रति टॅक्टर

खत पसरविणे - एक हजार रुपये प्रति ट्रॉली

बांध बांधणी व इतर कामासाठी मजुरीचे दर - अडीचशे ते तीनशे रुपये रोज

'कसमादे परिसरात खरीपपुर्व मशागतीचे कामे सुरु आहेत. २४ जूनपर्यंत उन्हाचा तडाखा व उकाडा कायम असल्याने खरीपपूर्व मशागतींच्या कामांवर परिणाम झाला. त्यातच अधून- मधून लग्नतिथी आहे. पाऊस लवकर असल्याची चिन्हे असल्याने प्रत्येकाची आपापले शेत तयार करण्याची लगबग सुरु आहे. यामुळे एकंदरीतच वेळ कमी अन्‌ सोंगे फार अशी स्थिती आहे. त्यातच अद्यापही कांदा काढणी, कांदा चाळीत भरणे ही कामेही सुरु आहेत. त्यामुळे मजूर मिळवितांनाही स्पर्धा व चढाओढ होत आहे. अशा स्थितीत अल्प भूधारक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर पाठवून नांगरणी, वखरणी करण्यास अनेक जण नाक मुरडत आहेत."

- अभिमन मोरे, प्रगतिशील शेतकरी, आघार खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT