bridge built by farmers using empty plastic drums. esakal
नाशिक

Nashik : पूल वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीसाठी ‘पाळण्याचा’ जुगाड!

सकाळ वृत्तसेवा

नैताळे (जि. नाशिक) : यंदा पावसाने घातलेला धिंगाणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. अनेक ठिकाणी फरशीपूल वाहून गेले आहेत. अशा स्थितीतही मार्ग काढण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या सोमठाणे शिवारात देव नदीला या वर्षी जास्त पाऊस झाल्याने आलेल्या पुरात पूल वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात नेण्यासाठी रिकाम्या प्लॅस्टिकच्या ड्रमचा जुगाड करत नित्यक्रमात खंड पडू दिलेला नाही. (Farmers made bridge from empty plastic drums to transport agricultural products to market at naitale Nashik News)

सोमठाणे-ब्राह्मणवाडेच्या सीमेवर घुमरे टोकवस्ती आहे. या वस्तीवर बरीच शेतकरी कुटुंबे वास्तव्यास आहेत. या शेतकऱ्यांना वस्तीवर जाण्यासाठी देव नदीवर सिमेंट पाइप टाकून पूल बनविण्यात आला होता; परंतु काही दिवसांपूर्वी देव नदीला पूर आला आणि तो वाहून गेला. सुमारे महिन्यापासून वस्तीवरील शेतकऱ्यांचा टोमॅटो माल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विक्रीसाठी जाऊ लागला आहे.

दररोज दोन ते तीन पिक-अपमध्ये जाळ्या भरून टोमॅटो नेला जात आहे. मात्र पूल वाहून गेल्याने या शेतकऱ्यांना शेतमाल नेण्यासाठी रस्ताच नव्हता. महेश घुमरे, सागर डिक्के, सचिन आव्हाड, विठ्ठल घुमरे आदी शेतकऱ्यांनी प्लॅस्टिकच्या पाण्याचे दोनशे लिटरचे दोन ड्रम घेतले. त्यावर फॅब्रिकेशन करून डिझाइन केले. दोन दोरखंडांना हा पाळणा बांधून त्यावर टोमॅटोच्या आठ जाळ्या वाहण्याचे काम महिनाभरापासून सुरू आहे.

विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

"ब्राह्मणवाडे शिवारातील घुमरे टोक वस्तीवरील सहा मुले शाळेत जातात. मात्र नदीला पूर असल्याने व पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गुडघाभर पाण्यातून पालक विद्यार्थ्यांची ने-आण करतात, तर शाळेला दांडी मारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. देव नदीवर सिमेंटचे पाइप टाकून आम्ही स्वखर्चातून पूल उभारला होता. मात्र तोही वाहून गेल्याने आम्हाला जीव धोक्यात घालून व वेळप्रसंगी पोहत जाऊन शेतमाल बाजारात न्यावा लागत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पूल होणे गरजेचे आहे."

-महेश घुमरे, शेतकरी, ब्राह्मणवाडे (ता. निफाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT