Police caught criminals esakal
नाशिक

वडनेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक तायडे यांच्या कामगिरीबाबत शेतकऱ्यांत समाधान!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकीकडे शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे संकटात असताना दुसरीकडे चोरट्यांना त्यांच्या विहिरीतील मोटारी देखील कमी पडू लागल्याने त्यांच्या चोरी होण्याच्या दुर्दैवी घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. परंतु या शेतकरी राजाच्या मागे पोलीस खंबीरपणे उभे असून त्यांनी या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याचे सत्कार्य केले आहे.

पोलिसांच्या या कामगिरी बाबत शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व विभागीय अधिकारी समिरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.यु. तायडे यांनी सहकाऱ्यांसह उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. (Farmers satisfied with performance of Assistant Police Inspector GU Taide of Vadner Bhairav Nashik Latest Marathi News)

पोलिसांची सदर कामगिरी अशी

शेतकरी संतोष भास्कर वाटपाडे , वय -५० वर्ष , व्यवसाय - शेती , रा.गट.नं. १३ , शिवरे , ता . चांदवड , जि . नाशिक यांचे शेत गट नं . १३ , मधील विहिरीतुन अज्ञात आरोपिने फिर्यादीचे मालकीची ७.५ HP ची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार ( १५ वर्षा पूर्वीची जुनी कंपनी माहित नाही ) ही विहिरीतुन बाहेर काढुन एस . डी . पाईप फोडुन व इलेक्ट्रीक वायर कट करुन चोरुन नेल्या बाबत फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलीस स्टेशनला I गु.र.न. १७१ / २०२२ भा.द.वि.क. ३७ ९ , ४२७ प्रमाणे दि .०५ / ० ९ / २०२२ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.

सचिन पाटील , पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण , चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक , मालेगाव , समिरसिंग साळवे , मनमाड उपविभाग , मनमाड यांनी व्यक्तीशः लक्ष घालुन सदर गुन्हा उघडकीस आणून सुचना दिल्या. त्यांचे मागदर्शनखाली गुन्ह्याचा तपास सुरु होता.

गुन्ह्याचा तपास सुरु असतांना वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व जी. यु. तायडे, सहा. पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली भैरव पोलीस ठाणेकडील तपास पथाकातील डी. एम. गवारे, पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. २२३६ एस. जे. उबाळे, पो. हवा. ३१ एस. आर. आवारे, पो. हवा. १६४ ९ पी. आर. जाधव, चा. पो. हवा. २३६४ आर. एम. कोरडे, पो. ना. २०१३ पी. पी. वाघमारे, पो. शि. २६४४ एम. के. पिठे, चा. पो. शि. २ ९०७ ए. बी . चारोस्कर , पो. शि. २ ९ ८७ पी. बी. भुसाळ यांचे तपास पथक तयार करण्यात आले.

गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेले माहितीनुसार मौजे शिवरे तालुका - चांदवड येथील संशयीत इसम १ ) नामदेव श्रीपत गांगुर्डे , वय २२ वर्ष , रा. शिवरे, ता. चांदवड, जि. नाशिक यास विश्वासात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा १ ) प्रविण लक्ष्मण भोये , वय - २७ वर्ष, रा. संगमनेर वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक २ ) प्रविण उत्तम गुंबाडे, वय - २२ वर्ष, मुळ रा. टिटवे, ता. दिंडोरी, हल्ली रा. शिवरे शिवार, ता. चांदवड, जि. नाशिक ३ ) रंजित ऊर्फ शरद बाळु गांगुर्डे, वय - २२ वर्ष, रा. चिखलआंबे, ता. चांदवड, जि. नाशिक यांचे सोबत केलेला असुन सदर चोरलेल्या इलेक्ट्रीक मोटारी त्याने आरोपी संजय तुमडू जावरे, वय -३७ वर्ष, रा. इंदिरानगर, आदिवासी मुलांचे वस्तीगृहासमोर वणी, ता. दिडोरी जि. नाशिक यांना दिल्याची कबुली दिल्याने आरोपी मचकुर यांना चिखलआंबे, शिवरे, ता. चांदवड, जि. नाशिक व संगमनेर ता. दिंडोरी जि. नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी क्र. १ ते ५ यांचेकडुन 5 इलेक्ट्रीक पाणबुडी मोटारी व गुन्हा करतेवेळी वापरलेल्या दोन मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवा. २२३६ एस. जे. उबाळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT