Tired Farmer esakal
नाशिक

Nashik : ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ‘शॉक’; MSEDCLने वीजबिल वसुली सुरू केल्यान नाराजी

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : रब्बीच्या पेरणीसाठी बी-बियाणे विकत घेण्यासाठी सध्या शेतकरी धावपळ करताना दिसत असून, अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करत असतानाच मनमाडसह नांदगाव तालुक्यात महावितरणने वीजबिल वसुली सुरू केल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामात शॉक बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरणबद्दल नाराजी आहे. (farmers shock in rabi season over MSEDCL start of electricity bill collection Nashik Latest Marathi News)

खरिपाचे अवकाळी पावसामुळे पूर्ण नुकसान झाले आहे, तर रब्बीची पेरणी तोंडावर आहे. कांद्याला पाणी भरण्याचा मोसम सुरू असून, दुसरीकडे रब्बीच्या पेरण्या करण्यासाठीची लगबग सुरू आहे. रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करत आहे. त्यातच मनमाड परिसरासह नांदगाव तालुक्यात महावितरणने वसुलीची मोहीम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीज वितरण उपविभागीय कार्यालयाने सर्व विभागांना वसुलीच्या सूचना दिल्या आहेत. या विभागांतर्गत असलेल्या तालुक्यातील मनमाड भागात एकूण १३८ रोहित्र आहेत या रोहित्रांवर पाच हजार ८८० शेतीपंप ग्राहक आहेत. यातील थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांकडे ७५ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुली होत नसल्यामुळे महावितरण कंपनीने २४ रोहित्र बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात शॉक बसला आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे.

एकीकडे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असा शासनाचा आदेश असतानाही मनमाड, नांदगाव तालुक्यांत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांयांकडून सक्तीने थकीत वीजबिल वसुली सुरू केली आहे. ज्या भागातील शेतकऱ्यांनी बिल भरले नाही त्यांचे रोहित्र बंद करण्यात आले आहे. वीज खंडित झाल्याने पाणी भरावी लागणारी पिके धोक्यात आली आहेत.

महावितरण विभागाचे आवाहन ...

शेतकऱ्यांची वीजबिल वसुली सुरू केली, तर महावितरणने शेतकऱ्यांना नियमित वीजबिल भरा, कृषी योजनांचा लाभ घ्यावा, या योजनेतून शेतकऱ्यांना सूटदेखील मिळते. थकबाकीदारांनी पूर्ण रक्कम भरल्यास ३० टक्के सूट मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

मनमाड विभाग

शेतीपंपधारक ग्राहक : ५८८०

रोहित्र : १३८

बंद करण्यात आलेले रोहित्र : २४

एकूण थकबाकी : ७५ कोटी

नांदगाव विभाग

शेतीपंपधारक ग्राहक : १३०००

रोहित्र : ६००

बंद करण्यात आलेले रोहित्र : ११०

एकूण थकबाकी : १३४ कोटी

तालुका विभाग

शेतीपंपधारक ग्राहक : १८८८०

रोहित्र : ७३८

बंद करण्यात आलेले रोहित्र : १३४

एकूण थकबाकी : २११ कोटी

वीजबिल भरणारे ग्राहक केवळ २ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

SCROLL FOR NEXT