Farmers throwing tomatoes at market committee premises on Wednesday. esakal
नाशिक

Nashik Tomato Rates Fall: दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी फेकले टोमॅटो

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rates Fall : बाजार समितीच्या आवारात टोमॅटोला अक्षरशः २ ते ५ रुपये किलो भाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून देत रोष व्यक्त केला.

२० किलोच्या क्रेट्‌सला ५० ते १०० रुपये भाव मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र, मोठ्या प्रमाणात दरात घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्च निघणे मुश्किल झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. भाव कमालीचे घसरल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून आपला संपात व्यक्त केला. (Farmers throw away tomatoes due to fall in prices nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, गेल्या महिन्यात टोमॅटो उत्पादकांची मोठी होल्डींग लावणारा टोमॅटो आता रुसला आहे. सरासरी २६०० रुपये प्रतिक्रेट विकला गेलेला टोमॅटो सध्या १०० रुपये प्रतिक्रेट भाव झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या महिन्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लखपती केलेल्या टोमॅटोने आता रडविण्यास सुरवात केली आहे. भाव वाढल्याने केंद्र सरकारने टोमॅटो आयात करत दर घसरण थांबवली आणि आता टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून रोष व्यक्त करीत आहेत.

मात्र, शासन काही लक्ष देत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT