पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात खरीप हंगामातील ४० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना बुधवारी (ता. १८) मध्यरात्री हलक्या व रिमझिम पावसामुळे मोठे जीवदान मिळाले. शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर संततधार पाऊस सुरू असल्याने टोमॅटो, सोयाबीनसह पिके तरली आहेत. तरीही अद्याप मुसळधारेची प्रतीक्षा कायम आहे. २४ तासांत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
श्रावण महिन्याला प्रारंभ होऊन आठवडा उलटला तरी तालुक्याचे शेतीशिवार ओलेचिंब झाले नव्हते. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, टोमॅटो आदी पिके पाऊस नसल्याने संकटात सापडली होती. पिके कोमेजू लागल्याने पेरणी वाया जाते की काय, अशी धास्ती शेतकऱ्यांना होती. चिंतेचे ढग दाटलेले असताना बुधवारी पावसाचे कमबॅक झाले. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे, पण अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा पाऊस निफाड तालुक्यात ४५० मिलिमीटरची सरासरी गाठणार की नाही, याबाबत साशंकता होती. पावसाच्या पुनरागमनाने दिलासा मिळाला आहे.
छत्र्या, रेनकोट घेऊन नागरिक घराबाहेर...
नोकरी, बाजारात खरेदीसह विविध कामानिमित्त आज घराबाहेर पडताना नागरिक आज छत्री, रेनकोट घेऊन बाहरे पडले. दमदार नसला तरी सातत्याने रिमझिम पावसाने द्राक्षनगरी व परिसर ओलाचिंब झाला. शहराच्या उपनगरातील रस्ते चिखलमय झाले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झालेले दिसले. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.