अंतापूर (जि.नाशिक) : दोन दिवस अगोदरच या घरात मुलीचे लग्न पार पडले. लेकिच्या लग्नाचा मांडव उतरत नाही तोच शुभ कार्याच्या आनंदावर विरजण पडले. आणि क्षणात अवघा गाव शोकसागरात बुडाला. जणू बापाचे कर्तव्य पार पाडत तो स्वर्गयात्रेला निघाला..काय घडले नेमके?
मुलीच्या लग्नानंतर दोन दिवसातच पिता जग सोडून गेला..
दोन दिवस अगोदर मुलीचे लग्न झाले होते. लेकीचे लग्न उत्तमरित्या पार पडले म्हणून संपूर्ण भोये कुटुंब आनंदात होते. पण क्षणार्धात त्या सुखाला कोणाची तरी नजर लागली. मोहोळांगी (ता. बागलाण) येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित केशव भोये (वय ५६) यांना अचानक छातीत कळ आल्याने नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पंडित केशव भोये हे ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव भोये यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.