Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar Latest Marathi News esakal
नाशिक

आपत्कालीन कामात कसूर; 4 कर्मचाऱ्यांना नोटीस

विक्रांत मते

नाशिक : आपत्कालीन व्यवस्थेवर (emergency system) नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner) यांनी एक फायरमन व तीन वरिष्ठ लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Fault in emergency work Notice to 4 employees by NMC Commissioner NMC latest Marathi news)

महापालिकेकडून मुख्यालयात आपत्कालीन कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्येदेखील तत्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी आपत्कालीन कक्ष उभारण्यात आले आहे.

आपत्कालीन कक्षांमध्ये नोडल अधिकारी, तसेच आपत्कालीन क्रमांकदेखील जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने सेवा उपलब्ध होण्यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या सेवेचा वाईट अनुभव खुद्द आयुक्त पवार यांनाच आला.

आपत्कालीन व्यवस्था कक्षातील सेवा व्यवस्थित आहे की नाही, याची चाचणी करण्यासाठी आयुक्त पवार यांनी पहाटे महापालिका मुख्यालयातील कक्षाला दूरध्वनी केला. मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर मिळाली नाही, तर काहींनी दूरध्वनी उचललादेखील नाही.

त्यामुळे चौघांना तातडीने नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ लिपिक विजय परडे, रमेश भालेराव व महेंद्र परदेशी या वरिष्ठ लिपिकांना, तसेच फायरमन आर. एस. गांगुर्डे यांना कारणे दाखवा नोटीस मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT