Photograph taken of the free movement of leopards at Vardar Shivara in Kandhane. esakal
नाशिक

Nashik Leopard News : बिबट्याच्या मुक्त संचाराने भीती! बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात होतेय दर्शन

वीज वितरण कंपनीकडून शेती पंपासाठी रात्री वीजपुरवठा होत असल्याने पीक जगविण्यासाठी बिबट्यांच्या भीतीने जीव मुठीत धरून शेतकरी पाणी देण्यासाठी जात आहेत.

प्रकाश बिरारी

कंधाणे : येथील वरदर शिवार व सुकड नाला परिसरात बिबट्यांचा सतत वावर आढळून येत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत अवस्थेत असून वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी बिबट्याने रस्त्याने जाणाऱ्यांवर थेट झेप घेत हल्ला केला होता, तत्पूर्वीही बिबट्याने शेळ्या, कुत्र्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. (Fear of free movement of leopard Darshan taking place in western belt of Baglan Nashik News)

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात जंगल, डोंगराळ भाग असल्याने बिबट्यांना आयताच अधिवास मिळतो, त्यामुळे या भागात बिबटे आढळून येतात, मात्र आता ते मानवी वस्तीकडे जास्त वळू लागल्याने चिंता वाढली आहे.

वीज वितरण कंपनीकडून शेती पंपासाठी रात्री वीजपुरवठा होत असल्याने पीक जगविण्यासाठी बिबट्यांच्या भीतीने जीव मुठीत धरून शेतकरी पाणी देण्यासाठी जात आहेत.

त्यामुळे वनविभागाने तत्परतेने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा व शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

गावाच्या दक्षिणेकडील भागडा व तिळवण किल्ल्याच्या डोंगररांगेतील जंगलात आसरा घेणाऱ्या बिबट्यांचा मानव वस्तीकडे वावर वाढला आहे. बहुतांश शेतकरी आपापल्या शेतात घर बांधून राहतात, त्यांच्या पाळीव प्राणी कुत्रे शेळ्यांवर हल्ला करणे नित्याची बाब झाली आहे.

परिसरात प्रमुख नगदी पीक उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे, अशा परिस्थितीत एकीकडे बिबट्यांची दहशत व भारनियमनामुळे दिवसा कमी व रात्री अपरात्री जास्त वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत पिकाला द्यावे लागत आहे.

ज्या शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार आढळतो, तेथील शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी धजावत नाहीत. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. शिवारातील शेतकरी समूहाने पाणी देण्याचे नियोजन करीत आहेत.

शेतकरी, गुराखी व रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना कुणाला तरी दर्शन देणाऱ्या बिबट्यांपासून आपल्या स्वतःचा जीव वाचवित पिके व पाळीव प्राणी जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

त्यामुळे बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतात राहणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे व वीजवितरण कंपनीने जास्तीत जास्त दिवसा वीज देण्याचे नियोजन करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT