Citizens' shopping for ghagar on the eve of Akshaya Tritiya & Meena bazaar filled with Ramadan esakal
नाशिक

Festivals 2023 : अक्षय तृतीया, ईदसाठी झळाळी; आंबा, शिरखुर्म्याचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Festivals 2023 : अक्षय तृतीयेसाठी तयार करण्यात येणाऱ्या करा-केळींचा येथे बाजार भरला आहे. शनिपटांगनासह बाजारपेठ कराकेळी व आंब्याने फुलली आहे. तसेच, ईदलाही मोठे महत्त्व असल्यामुळे शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील विविध भागात मोठी गर्दी उसळली होती.

ईदला मुस्लिम बांधव सर्वधर्मींयांना शिरखुर्म्याची मेजवानी देतात. यामुळे ही मेजवानी सामाजिक सौहार्द वाढवणारी असते. असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Festivals 2023 Akshay Tritiya ramzan Eid Crowd to buy mango shirkhurma ingredients nashik news)

शिरखुर्म्याचे साहित्य दरात वाढ होऊनही विक्रमी विक्री शिरखुर्म्याचे साहित्य म्हणून काजू, बदाम, खोबरे, चारोळी पिस्ता, किसमिस, शेवया, बडीशोप, धनादाळ, टरबूज बी, विलायची आदी वापरले जाते. तब्बल २० टक्क्यांनी साहित्याचे दर वाढलेले असतानाही शिरखुर्म्याच्या साहित्याची विक्रमी विक्री होत आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला हिंदू धर्मात महत्त्व असल्यामुळे मोठ्या श्रद्धेने पूजाविधी केले जातात. मातीच्या भांड्यात आंबा ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे नव्या करा-केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो.

येथील बाजारात लहान व मोठ्या प्रकारच्या करा-केळी उपलब्ध आहेत. मोठ्या आकारातील करा-केळी ७० ते ८० रुपये तर लहान आकारातील करा-केळी ५० ते ६० रुपये किमतीत विक्री केल्या जात आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर येवल्यात मोठ्या प्रमाणावर आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. हापूस व केशर आंब्यांना नागरिकांची मोठी पसंती देखील दिसून येत आहे.५० ते १५० रुपये किलो दराने आंबे मिळत असून केशरला सर्वाधिक मागणी आहे.

अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने काही प्रमाणात या आंब्याची आवक घटल्याने आंब्यांच्या दरात वाढ झाली आहेत. यामुळे अक्षय तृतीया सणाला आंबे खरेदी करताना सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT