नाशिक : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या.
पोलिसांनी रविवारी (ता.३१) रात्री ९ वाजताच रस्त्यावर उतरून खाद्यपदार्थांच्या हातगाड्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्या बंद केल्या. परिणामी, मद्यपान करून रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्यांचा फिव्हरच उतरला.
तरीही, रस्त्यावर बॅरिकेटिंग करून केलेल्या कारवाईमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३३६ वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करीत सुमारे दोन लाखांचा दंड वसुल केला तर, मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या २२ चालकांविरोधात मोटारवाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्त्यावर नेहमी दिसणारा थर्टी-फस्टचा ‘फिव्हर’ चढलाच नाही. (fever of 31st brought down by police 336 action against unruly Nashik news)
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालय हद्दीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणेनिहाय फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्यात आलेली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, मद्यपान करून धिंगाणा घालणार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून रात्रभर सातत्याने गस्त सुरू होती.
परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १५१ टवाळखोर आणि ६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.
त्याचप्रमाणे, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह चुंचाळे पोलीस चौकी या हद्दीत १६३ टवाळखोर आणि ६८ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे नेहमी नववर्षाच्या रात्री रस्त्यावर होणारा धिंगाणा यावेळी झाला नाही.
असा होता बंदोबस्त
पोलीस उपायुक्त : ३, सहायक आयुक्त - ६, पोलीस निरीक्षक ५९, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - ९२, पोलीस अंमलदार - ८८४, होमगार्ड - ५००
बेशिस्तांवरील कारवाई
विनाहेल्मेट - १८९
विनासीटबेल्ट - २४
ट्रीपलसीट - ४७
ब्लॅक फिल्म - ०३
नो-एन्ट्रीं - १३
सिग्नल जंम्प - २४
नो-पार्किंग - १
अन्य उल्लंघन - ३५
एकूण केसेस : ३३६
एकूण दंड : १, ९५,२५० रुपये
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह - २२
एकूण टवाळखोर : ४४५
हातगाड्या केल्या बंद
रस्त्यालगत खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागतात. याठिकाणी बर्याचदा मद्यपी मद्याचे पार्सल आणून पितात आणि खाद्यपदार्थ खातात. रविवारी (ता.३१) रात्री पोलिसांनी हीच बाब हेरून शहरातील चौकांमध्ये लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्याच ९ वाजेपासून बंद करण्यास सुरुवात केली.
परिणामी त्याठिकाणी येऊन मद्यपान करणार्यांची पंचाईत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री दहा वाजेनंतर पोलिसांनी बॅरिकेटींग करून नाकाबंदी मोहीम व ऑलआऊट ऑपरेशन राबवून कारवाई केली. यामुळे रात्री १० नंतरच शहरातील रस्त्यावर फक्त पोलिसांचाच फौजफाटा दिसत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.