नाशिक : शहरातील विविध क्षेत्रातील पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवबंधन बांधून चार वकिलांसह पन्नास कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी बैठक घेत, जे सोडून गेले त्या गद्दारांचा विचार न करता नव्याने पक्ष बांधणी करून आगामी महापालिका निवडणुका जिंकण्याचा निर्धार करण्याचे आवाहन करीत संघटनात्मक बांधणीच्या सूचना दिल्या. (Fifty activists join Uddhav Thackeray Group Welcome by Sanjay Raut maharashtra political news)
उपनेते बबन घोलप, सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे आदी उपस्थित होते.
ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांत ॲड. डी. आर.विधाते, ॲड. अरुण माळोदे, ॲड. हर्षल जाधव, ॲड. किशोर सोनवणे या चार ४ नामांकित वकिलांसह मखमलाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते किरण काळे, सुनील वाघ, परचंडे, सुधीर कुमावत, किसन गामणे, प्रकाश वाघ, संतोष मोरे, दिंडोरी तालुक्यातील विजय गांगुर्डे, विश्वास उगले, प्रेम गांगुर्डे, सुरेश उगले,
बाळासाहेब सितान, दीपक गायकवाड, विशाल आहिरे, फारुख शेख, निखिल गांगुर्डे, सातपूर शहरातील विशाल भदगे, बाळासाहेब भालेराव, शरद सोनवणे, सूरज चोरमारे, बाळासाहेब गवई, बाबासाहेब मानकरी, सिध्दार्थ ताठोरे, भागवत गायकवाड, सुरेश साळवे, मनोहर कांबळे, राजेश आंभोरे, नंदू लहाने,
प्रतीक ऐखंडे, नामदेव सपकाळ, प्रदीप मोरे, हनुमान पाटेकर, ज्ञानदेव जाधव, विलास बगाटे, पिराजी चरफे, पंकज पवार, नीलेश पवार, संदीप वंजारी आदींनी प्रवेश केला. या वेळी माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राऊत यांच्या हस्ते झाले. माजी मनपा गटनेते विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप,
युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, दीपक खुळे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, माजी महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, भारती जाधव, समन्वयक अॕड. श्यामला दीक्षित, मंदा दातीर, माजी महापौर नयना घोलप आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.