Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
नाशिक

Nashik Political News: सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये झुंज सुरू! नाशिक लोकसभा कुणाला पावणार?

भाजपकडून स्वपक्षातील उमेदवारांची चाचपणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Political News : विविध विकासकामांच्या उद्‍घाटनांबरोबरच वादाचे विषय अधिक तीव्रतेने चर्चेला येत असल्याने लोकसभेचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सत्तेतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेचा शिंदे गट या तीन इंजिनच्या सरकारमध्ये शाब्दिक झुंज सुरू झाली आहे.

विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने शिंदे गटाचा दावा, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा असल्याने त्यांनी ही जागा लढविण्याची तयारी केली आहे. भाजप सर्वेक्षणावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे.

दोन्ही पक्षांची स्थिती लक्षात घेऊन ‘लोकसभा फर्स्ट’चे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने हातची जागा जाऊ नये म्हणून स्वपक्षाच्याच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. (fight between bjp ncp shivsena parties in power Nashik Lok Sabha election Political News)

पुढील वर्षाच्या मध्यावर लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. २०१४ व २०१९ च्या निवडणुकांपेक्षा यावेळच्या म्हणजेच २०२४ च्या निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. गेल्या निवडणुकीत ४२ खासदार होते.

यंदा ते लक्ष्य गाठण्यासंदर्भात साशंकता आहे. उत्तर प्रदेशाखालोखाल लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात जागांमध्ये वजावट नको म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले.

असे असले तरी त्या घटक पक्षांचे स्वतःचे स्थान अबाधित ठेवण्यात आले. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वाटा मागितला जाणारच. त्यामुळे लोकसभेचे वातावरण निर्माण होत असताना नाशिकच्या जागेसंदर्भातील विषय या लोकसभा मतदारसंघापुरता चर्चेला जात आहे.

नाशिकमध्ये तिन्ही पक्षांची समान ताकद आहे. भाजप व शिंदे गटाची शहरात ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ग्रामीण भागात जास्त आहे.

मनगटातील ताकदीच्या जोरावर तिन्ही पक्षांकडून शहरातील चार विधानसभा व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सिन्नर या लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्याची तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाजपच ठरविणार जागांचे सूत्र

एकसंघ शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत सहभागी झाल्याने आगामी निवडणुका भाजपसोबत लढविल्या जातील. शिंदे गटासाठी नाशिक लोकसभा महत्त्वाची आहे.

विद्यमान खासदारही शिवसेनेच्या शिंदे गटाचे असल्याने नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा दावा राहील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वी चार खासदार होऊन गेल्याने या पक्षाकडूनही दावेदारी सुरू आहे.

जागांच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा मागण्याची तयारी सुरू झाली असून, त्यासाठी बोलणारे कार्यकर्ते तयार केले जात आहेत. दोन्ही पक्षांकडून नाशिकच्या जागेची मागणी केली जात असली तरी प्रत्यक्षात जागावाटपाचे सूत्र भाजपच्याच हाती राहणार आहे.

सर्वेक्षणात काय परिस्थिती राहील, यावर पक्षांना जागावाटपाचे सूत्र ठरेल. दोन्ही पक्षांबाबत नाराजीचा सूर राहिल्यास भाजप पक्षाचाच उमेदवार उभा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीत शिवसेना

महाविकास आघाडीत नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडली जाईल, असे सांगितले जाते. ठाकरे गटानेही शिंदे गटप्रमुख स्पर्धक मानून उमेदवार चाचपणीची तयारी सुरू केली आहे. ऐनकेन प्रकारे नाशिकची जागा जिंकण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT