मनमाड (जि. नाशिक) : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुंबई पोलिस (Mumbai Police) व महाराष्ट्र शासनावर (State Government) जातीयवादी व बदनामीकारक खोटे आरोप केल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिवसेना (Shiv sena) महिला आघाडी व युवती सेनेतर्फे पोलिसांना देण्यात आले.
महाराष्ट्र शासन व पोलिसांना बदनाम करण्यासाठी राज्यात दंगली घडविण्याच्या भावनेने मातोश्रीसमोर गर्दी जमा करून हनुमान चालिसा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला. वारंवार प्रक्षोभक वक्तव्ये केले. मुख्यमंत्र्यांविरुद्ध अर्वाच्य शब्दांत उल्लेख केला. अशा प्रवृत्तींविरूध्द कारवाई करण्याची तातडीने गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर नेहा जगताप, कल्पना दोंदे, संगीता बागूल, विद्या जगताप, नजमा जाफर मिर्झा, कविता पाटेकर, निता लोंढे, पूजा छाजेड, सपना महाले, स्नेहल जाधव, प्रांजली सूर्यवंशी, कविता काळसर्पे, ललिता ठोंबरे, सृष्टी देशमुख, कोमल भालेराव, दिक्षा झाल्टे आदींसह महिला आघाडी व युवती सेना कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, जाफर मिर्झा, छोटू धाकराव, राजेश धोंडगे, महेंद्र गरूड, सचिन दरगुडे, कृष्णा जगताप, पवन बागूल, कलश पाटेकर आदी शिवसैनिकही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.