corporators esakal
नाशिक

'त्या’ 27 नगरसेवकांच्या अपात्रतेची फाइल विभागीय आयुक्तांकडे

विक्रांत मते

नाशिक : मागील पंचवार्षिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून बंडखोरी करणाऱ्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर (MNS corporator) अपात्रतेची कारवाई केल्यानंतर त्याच न्यायाने जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत (jalgaon muncipal elections) पक्षादेश झुगारणाऱ्या २७ नगरसेवकांवर कारवाई होणे अपेक्षित असताना विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेल्या तीन महिन्यांपासून अपात्रतेच्या कारवाईची फाइल पडून आहे. कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होऊ लागला असून, कारवाई न होण्यामागे शिवसेनेचा (shivsena) दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (File-disqualification-of-27-corporators-To-Divisional-Commissioner)

विभागीय आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मार्च महिन्यामध्ये जळगाव महापालिकेच्या २७ नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. भाजप नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे जळगाव महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. याविरोधात माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे दाद मागण्यात आली. ३१ मार्च २०२१ ला ३० हजार पानांचा दस्तावेज नाशिक महापालिकेचे तत्कालीन भाजप गटनेते जगदीश पाटील व जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी सादर केला होता. मात्र तीन महिने उलटूनही त्यावर कारवाई होत नसल्याने विभागीय आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाला असून, आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ३० हजार पानांची छाननी करण्यात आल्याचे समजते.

शिवसेनेच्या दबावाची चर्चा

२०१५ मध्ये नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसेच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली होती. पक्षाचा आदेश झुगारल्याने याविरोधात तत्कालीन विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात आली. त्या वेळी मनसेच्या याचिकेवर सुनावणी करताना दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय तत्काळ देण्यात आला होता. मात्र या प्रकरणात अद्यापही बंडखोरी केलेल्या २७ नगरसेवकांना नोटीस काढली जात नसल्याने यामागे शिवसेनेचा दबाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र जळगाव संदर्भात निर्णय का होत नाही यावरून विविध प्रकारची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: नरेंद्र मोदींनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT