Commissioner and Administrator Bhalchandra Gosavi while presenting the final budget of the Municipal Corporation.  esakal
नाशिक

Nashik News : महापालिकेच्या अंतिम अंदाजपत्रकास मंजुरी; करवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महानगरपालिकेच्या कुठलीही करवाढ नसलेले २०२३-२४ च्या ६८१ कोटी ७० लाखाच्या अंतिम अंदाजपत्रकास आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी गुरुवारी (ता.१३) मंजुरी दिली. (final budget of Municipal Corporation of 681 crore 70 lakhs without any tax increase Approved nashik news)

वर्षाअखेरीस सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य नगरसेवकांसाठी प्रत्येकी ४ लाख या प्रमाणे ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अत्यावश्‍यक व महत्त्वाच्या विकासकामांसाठी ५८ कोटी रुपयांची तरतूद असल्याचे श्री. गोसावी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

लेखा विभाग व प्रशासनातर्फे लेखापरीक्षक तथा उपायुक्त राजू खैरनार, लेखा विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील खडके यांनी गेल्या महिन्यात अंदाजपत्रक सादर केले होते. २८ मार्चला प्रशासकीय मान्यतेनंतर अंदाजपत्रकावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

श्री. गोसावी म्हणाले, २०२३-२०२४ चे अंदाजपत्रकात शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या ४९८ कोटींची भुयारी गटार योजना, १४७ कोटींची अमृत-२ पाणीपुरवठा योजना व सुमारे शंभर कोटींचे सिमेंट काँक्रिट रस्ते अशा तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शहरातील सर्व धर्मियांच्या सण-उत्सवांसाठीच्या मिरवणूक मार्ग असलेल्या प्रमुख रस्त्यांसह सर्व रस्ते आगामी काळात सिमेंट काँक्रिटचे तयार केले जाणार आहेत. तसेच, पूर्व भागात ४० कोटी व पश्‍चिम भागात ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. २७ कोटी रुपये स्पील ओव्हर कामांसाठी आहेत. गेल्या वर्षातील अंदाजपत्रकातील ८६ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.

महापालिकेचे २०२२-२३ चे अंदाजपत्रक सुमारे ५९९ कोटींचे होते. यंदा अंदाजपत्रकात सुमारे ८२ कोटींची वाढ झाली आहे. खासगी एजन्सीमार्फत मालमत्ता सर्वेक्षण केल्यानंतर गृहकरापासून मिळणारे उत्पन्न वाढणार असून हे उत्पन्न सुमारे १०० कोटीपर्यंत असेल. अमृत-२ करिता महापालिकेने १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वृक्ष गणनेसाठी २५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी प्रथमच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार शहरात इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग स्टेशनसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एकात्मता चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन कोटी तर शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या वेळी लेखापरीक्षक तथा उपायुक्त राजू खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव, विभागप्रमुख हरीश डिंबर, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, लेखा विभागाचे संदीप नागपुरे, हफिजुर रहेमान, अरुण सुरते, सुनील मोरे, सनी पवार आदी उपस्थित होते.

अंदाजपत्रकातील ठळक बाबी

* आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिका स्वयंपूर्ण

* १०० बेडचे तीन व ६० बेडचे एक रुग्णालय

* स्वतंत्र ऑक्सिजन प्लान्ट कार्यरत

* अमृत-२ मध्ये तळवाडे ते मालेगाव नवीन जलवाहिनी

* अमृत-२ मध्ये चार नवीन जलकुंभ व शहरांतर्गत जलवाहिन्या

* सण-उत्सवातील मिरवणूक मार्ग सिमेंट काँक्रिट करण्यासाठी तरतूद

* परिपूर्ण सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

* दिव्यांग सोयी-सुविधांसाठी ५ टक्के स्वतंत्र तरतूद

* अपेक्षित महसुली उत्पन्न- ३८४ कोटी २८ लाख

* अपेक्षित महसुली खर्च - २७८ कोटी १० लाख

* गृहकराच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित

* ताजिया कुंडाचे काम सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT