NMC Reduction Meeting : दक्षिण प्रशांत महासागरातील संभावित ‘अल निनो’ वादळामुळे पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता गृहीत धरून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत एप्रिल महिन्यापासून पाणीकपात केली जाणार आहे.
मंगळवारी (ता. ११) राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन पाणीकपातीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. (Final decision regarding Water Reduction Meeting on Tuesday nashik news)
दरवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. यंदा जून ते जुलै महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात ‘अल निनो’ वादळ तयार होणार आहे. या वादळामुळे पावसाळा लांबणार असल्याने मॉन्सून विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासनाला सूचना करण्यात आल्या आहेत.
त्याअंतर्गत ३१ ऑगस्टऐवजी ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा वापरण्याच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एकदा, तर जून महिन्यात आठ दिवसातून दोनदा पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद केले जाणार आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
त्याचबरोबर जवळपास ११८० बोअरवेल व महापालिकेच्या तीसहून अधिक विहिरी स्वच्छ केल्या जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीकपात करण्याचे नियोजन होते. परंतु, राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या कृती आराखड्यानंतर शासन जो निर्णय घेईल तो मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याअनुषंगाने पाणी कपातीचा निर्णयदेखील शासनाकडे सोपविण्यात आला आहे. ११ एप्रिलला शहरातील पाणीकपात संदर्भात राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे बैठक होईल. त्यात पाणी कपातीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.