voter lists  esakal
नाशिक

Nashik Election : जिल्हा सरकारी-परिषद कर्मचारी बँक निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर

सेवानिवृत्त सभासदांचाही मतदार यादीत समावेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती, आक्षेप नोंदविल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (ता.१६) १३ हजार २४० मतदारांची अंतिम सभासदांची यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे.

यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Final list announced for District Government Council Staff Bank Election nashik news)

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅक निवडणुकीचा मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित झाला असून, १७ एप्रिल रोजी सात हजार ८५३ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर, २६ एप्रिलपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.

सहकार प्राधिकरणाने शासकीय कर्मचारी बॅंका, पतसंस्था, नागरी बॅंकांच्या कायद्यात दुरुस्ती केली. यात शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सभासदत्व अबाधित ठेवत त्यांचा मतदानाचा अधिकार कमी केला होता.

त्यामुळे बॅंकेच्या एकूण १५ हजार ८३८ सभासदांपैकी सुमारे ७ हजार ९८५ सभासद कमी झाले होते. या निर्णयामुळे सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनीच हरकती नोंदवीत, सेवानिवृत्त सभासदांसह जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर गत आठवड्यात सुनावणी झाली. यात न्यायालयाने सहकार विभागाने २० फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेल्या सेवानिवृत्त सभासदांच्या कमी करण्यात आलेल्या मतदान अधिकार आदेशाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती मिळाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बॅंकेकडून कमी करण्यात आलेल्या सेवानिवृत्त सभासदांची माहिती मागवून घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बॅंकेने या सभासदांची माहिती सादर केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सेवानिवृत्त सभासदांचा मतदार यादीत समावेश करीत १३ हजार २४० मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे.

यात मयत, कर्जदार सभासदांची नावे वगळण्यात आली आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने दोन दिवसात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

जाता -जाता केली स्वाक्षरी

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर सुनावणी प्रक्रीया होऊन अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होणार होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी या अंतिम यादीवर सायंकाळी उशिरा स्वाक्षरी केली.

मात्र, त्यानंतर लागलीच खरे यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली. त्यामुळे ही यादी सायंकाळी प्रसिद्ध होऊ शकली नाही. मंगळवारी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT