NMC News : शहरात ६३८ पैकी ५६८ रुग्णालयांनी वैद्यकीय विभागाकडे नोंदणी केली असून, उर्वरित ७० रुग्णालयांना वैद्यकीय विभागाकडून अंतिम नोटिसा पाठवून रुग्णालय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ अन्वये महानगरपालिका हद्दीतील रुग्णालय, प्रसूतिगृह, नर्सिंग होमला वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. (Final notices for closure of 70 hospitals NMC nashik news)
नोंदणी करताना अग्निशमन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ना- हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. दोन्ही दाखले दाखल झाल्यानंतरच वैद्यकीय विभागाकडून नूतनीकरण परवाना दिला जातो.
महापालिका हद्दीमध्ये ६३८ रुग्णालयांपैकी ५६८ रुग्णालयांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. त्यामुळे उर्वरित ७० रुग्णालयाकडून प्रमाणपत्र सादर न केल्याने ते रुग्णालय बेकायदेशीर ठरत आहे.
रुग्णालयांमधील वाढीव बांधकाम हे प्रमुख कारण अग्निशमन दलाचा दाखला मिळण्यामागे ठरत आहे. खासगी रुग्णालयांनी नोंदणी न केल्यास रुग्णालयांना टाळे ठोकणे व फौजदारी कारवाई केली जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
परंतु, नाशिक महापालिकेने कोरोना पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेतली नाही. परंतु, त्यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनाकडून प्रमाणपत्र मिळविणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने आता वैद्यकीय विभागाने थेट रुग्णालयांची परवानगी रद्द करण्याची भूमिका घेतली आहे.
७० रुग्णालयांना अंतिम नोटिसा बजावण्यात आले आहेत. सात दिवसात कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र घ्यावे अन्यथा रुग्णालय बंद करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.