Muhammad Ali Syed, accompanied by a Muslim brother, left for Hajj on foot at Badi Dargah. esakal
नाशिक

Haj Yatra: 20 वर्षापासूनच्या निश्चयास अंतिम स्वरूप; दिंडोरी रोड येथील महम्मद अली सय्यद यांची पायी हज यात्रा

सकाळ वृत्तसेवा

Haj Yatra : राज्याच्या पहिल्या पायी हज यात्रेस शहरातील बडी दर्गा येथून सोमवार (ता.३) प्रारंभ झाला. महम्मद अली सय्यद वर्षभराचा ७ हजार २१६ किलोमीटरचा पायी प्रवास करून ३ जून २०२४ ला सौदी अरेबिया येथील मक्का मदीना येथे पोचणार आहे.

दिंडोरी रोड येथील महम्मद अली सय्यद यांनी वीस वर्षापासून केलेला पायी हज यात्रेचा निश्चयास सोमवारपासून प्रारंभ केला. सकाळी त्यांनी सर्व धर्मीय श्रद्धास्थान असलेल्या बडी दर्गा येथून प्रवासास सुरवात केली. (Finalization of 20 year old determination Pilgrimage of Muhammad Ali Syed from Dindori Road to haj yatra nashik)

राज्यातील ही पहिलीच पायी हज यात्रा आहे. श्री. सय्यद वर्षभराचा ७ हजार २१६ किलोमीटरचा प्रवास करून ३ जून २०२४ रोजी सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का मदिना येथे दाखल होणार आहे. १६ जून २०२४ ला हज विधी पूर्ण करून ३० जून २०२४ ला परतीस निघणार आहे.

१ जुलै २०२४ रोजी यात्रा पूर्ण करून पुन्हा शहरात दाखल होण्याची शक्यता श्री. सय्यद यांनी व्यक्त केली. प्रवासादरम्यान प्रेम, भाईचारा आणि एकतेचा संदेश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाय यात्रेसाठी आवश्यक असलेली शासकीय सर्व प्रकारचे परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बडी दर्गा येथे फातेहा पठण करत त्यांचा प्रवास सुखमय निर्विघ्न पार पडावा. यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह तसेच मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहराच्या विविध भागातील मुस्लिम बांधवांनी त्यांची गळाभेट घेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नाशिक, गुजरात, राजस्थान, अजमेर शरीफ, इराण इराक असा प्रवास करत सौदी अरेबिया येथे दाखल होणार आहे. २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी अजमेर शरीफ येथून पुढील प्रवासास निघणार आहे.

"वीस वर्षापासून इच्छा होती, ती पूर्ण करण्याच्या मार्गावर प्रवास सुरू केला आहे. सर्वांच्या दुवा पाठीशी आहे. प्रवास निश्चितच पूर्ण होईल. आवश्यक सर्व शासकीय परवानगी घेऊनच अधिकृतरीत्या प्रवास सुरू केला आहे." - महम्मद अली सय्यद, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT