crime esakal
नाशिक

Nashik Crime News : अखेर ‘त्या’ शिक्षकाविरोधात सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल

आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्यातील एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक व वसतिगृह अधीक्षकांच्या गैरप्रकाराबाबत पालकांच्या तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्यातील एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक व वसतिगृह अधीक्षकांच्या गैरप्रकाराबाबत पालकांच्या तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती.

मात्र, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक दौऱ्यात आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत गुन्हा दाखल न करण्याबाबत विचारणा केली. (Finally case was registered against teacher in Satana police nashik crime news)

श्रीमती गोऱ्हे यांच्या आदेशानंतर प्राधिकृत प्राचार्यांनी रात्री उशिरा संशयित शिक्षकाविरोधात सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य निवासी शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचे गंभीर प्रकरण गेल्या महिन्यात उघड झाले होते. या प्रकारानंतर आदिवासी आयुक्तालयाने संशयित शिक्षक विनोद कहार याला निलंबित केले, तर प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. अधीक्षिका स्वाती पगार यांची नियुक्ती रद्द केली.

राज्य बालहक्क आयोगाने याची दखल घेत आदिवासी आयुक्तालयाकडे अहवाल मागविला होता. विधान परिषद उपसभापती गोऱ्हे यांनीही दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला केल्या होत्या. या पत्रानंतर पोलिसांनी संबंधित शाळेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. संबंधित विद्यार्थिनींशी संवाद देखील साधला.

मात्र, पालकांनी याबाबत तक्रार करावी अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता. उपसभापती गोऱ्हे यांनी सोमवारी जिल्हा दौरा करत बैठका घेतल्या. यात या प्रकरणाबाबत आदिवासी विभागाकडे विचारणा करत चौकशी केली. विभागाकडून सविस्तर अहवाल देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याने उपसभापती गोऱ्हे यांनी पुन्हा गुन्हा दाखल करण्याबाबत निर्देश दिल्याचे कळते. दुसऱ्यांदा दिलेल्या आदेशानंतर आदिवासी विकास विभागाकडून प्राचार्य बच्छाव यांना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar NCP: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन बडे नेते कॅमेऱ्यासमोरच भिडले, काय आहे नेमकं भांडणाचे कारण? व्हिडिओ व्हायरल

Rule Change: म्युच्युअल फंड ते क्रेडिट कार्ड... 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Whatsapp QR Code : QR कोड स्कॅन करा अन् हवी ती फाईल पाठवा; व्हॉट्सॲप चॅनलमध्ये आलेलं नवीन फीचर पाहिलंत काय?

Rama Ekadashi 2024: रमा एकादशीच्या दिवशी काय करावे अन् काय करू नये? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT