नाशिक : विधी अभ्यासक्रमांचे लेखी परीक्षा सलग येत असल्याने यासंदर्भात विद्यार्थ्यांसह विद्यार्थी संघटनेने हरकत नोंदविली होती. याची दखल घेताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विधी अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे समजते. तसे परिपत्रक विद्यापीठाने शुक्रवारी (ता.२३) जारी केले आहे. (Finally changes in schedule of law courses Success to AISF demand Nashik News)
सलग पेपर असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. या संदर्भात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) संघटनेतर्फे गेल्या १३ डिसेंबरला निवेदन दिले होते. शुक्रवारीदेखील नाशिक उपकेंद्रावर आंदोलन करत काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या संघटना, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
एलएलबी व बीए एलएलबी अंतिम वर्षच्या सत्र परीक्षांच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणींची दखल घेत पुणे विद्यापीठाने शुक्रवारी परिपत्रक काढून वेळापत्रकात बदल जाहीर केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.