Dada Bhuse & Nashik Truck Drivers Strike esakal
नाशिक

Nashik Truck Drivers Strike: अखेर तोडगा निघाला! नाशिकमध्ये टँकर चालकांचा संप मागे; इंधन पुरवठा होणार सुरळीत..

जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रतिनिधींशी मनमाड येथे चर्चा करत तोडगा काढला असून हा संप मागे घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Truck Drivers Strike : नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रतिनिधींशी मनमाड येथे चर्चा करत तोडगा काढला असून हा संप मागे घेतला आहे. (Finally solution Tanker drivers call off strike in Nashik Fuel supply will resolve Nashik)

नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, आज सकाळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेवून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधनपुरवठा पुर्ववत होणार असुन संप मागे घेतल्याने इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT